अगोदरच यावर्षी झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे खरीप हंगामात अतोनात नुकसान झाले. त्या संकटातून सावरून शेतकरी आता कसेतरी रब्बी हंगामाची पेरण्या पूर्ण करत असताना महावितरणने कृषी पंप थकीत वीज बिल वसुली साठी कृषिपंपांचावीजपुरवठा तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे
त्यामुळे मोठ्या प्रयत्नातून रब्बी हंगामात पेरणी केलेला गहू, ज्वारी, हरभरा आणि ऊस या पिकांना पाणी देण्याचे काम सुरू असताना वीज कनेक्शन तोडल्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत.
या सगळ्या परिस्थितीमुळे शेतकरी मेटाकुटीला येऊन शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. महावितरणने राबवलेल्या या मोहिमेच्या विरोधात भाजप कडूनही राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे. यावर ऊर्जा मंत्री नितीन राऊत म्हणाले की, शेतकऱ्यांना वीज बिले भरावेच लागतील जास्तीत जास्त यामध्ये सवलत देऊ शकतो आणि ती दिलेली आहे.
महावितरणवर 56 हजार कोटीचा बोजा आला आहे तो कुठून भरायचा? असा प्रश्नही नितीन राऊत यांनी केला आहे. ऊर्जामंत्री यांनी केलेल्या या वक्तव्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
महावितरणने अतिरेक केल्यास जशास तसे उत्तर देऊ. सदोष वीज बिले दुरुस्त करावीत तसेच विजबिलावरील दंड व्याज माफ करावे,शेतकरी बिले भरण्यास तयार आहे.
शेतकरी काही फुकटा नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे.कोरोना आणि अतिवृष्टीचा संकटामुळेमहाविकास आघाडी सरकारला जास्त काम करता आले नाही. मात्र, सरकारने पूरग्रस्तांची निराशा केली आहे.जास्तीच्या नुकसान भरपाईसाठी मी आजही आग्रही आहे. शेतकऱ्यांना न्याय देण्यात केंद्र आणि राज्य सरकार दोघेही कमी पडले, अशी टीका राजू शेट्टी यांनी केली आहे. (संदर्भ- कृषी नामा)
Share your comments