1. बातम्या

पाणी वापर संस्थांनी गावशिवारात पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी काम करावे-जलसंपदा मंत्री जयंत पाटील

शेती साठी असलेल्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पाणी वापर संस्थांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा असून यासाठी राज्यातील पाणी वापर संस्थांचे मजबुतीकरण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
jayant patil

jayant patil

 शेती साठी असलेल्या सिंचन व्यवस्थापनामध्ये पाणी वापर  संस्थांचा सहभाग हा खूप महत्त्वाचा असून यासाठी राज्यातील पाणी वापर संस्थांचे मजबुतीकरण करणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन त्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केले.

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या महात्मा फुले पाणीवापर संस्था अभियान व त्या अंतर्गत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पाणी वापर संस्था व्यवस्थापन व अभियांत्रिकी सेवेतील उत्कृष्ट अभियंता पुरस्कार वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी बोलताना पाटील म्हणाले की, पाणीवापर संस्थांचे व्यवस्थापन कार्यक्षम  व्हावे त्यासोबतच या संस्था सक्षम व्हावे यासाठी जलसंपदा विभागाने महात्मा फुले पाणी वापर संस्था व्यवस्थापन पुरस्कार योजना अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.

गाव शिवारामध्ये शेवटच्या घटकापर्यंत पाणी पोहोचवण्याची यंत्रणेसोबत या संस्थांचाही सहभाग फारच महत्त्वाचा आहे. गाव शिवारातील शेवटच्या घटकापर्यंत पाण्याचा कार्यक्षम वापर होण्यासाठी या संस्थांनी काम करावे असेही पाटील म्हणाले.सिंचनाच्या क्षेत्रांमध्ये लोकांचा सहभाग वाढावा यासाठी यासाठी शासन प्रयत्नशील असून त्यादृष्टीने पाणी वापर संस्था व जलसंपदा विभागातील अधिकारी यांचा एकमेकांशी समन्वय असणे खूपच आवश्यक आहे. 

पाण्याचा अगदी कार्यक्षमपणे वापर होणे गरजेचे असून यासाठी काम करणाऱ्या संस्था व अभियंत्यांचा जलसंपदा विभागाच्या वतीने प्रोत्साहन म्हणून जलसंपदा विभागाच्या वतीने गौरव करण्यात येतो. दरवर्षी यापुढे 15 सप्टेंबरला पुरस्कार वितरण कार्यक्रम घेण्यात येतील.

English Summary: do effective work to water distribution orgnization in last stage of farming Published on: 15 February 2022, 09:45 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters