Bhandara News : दिवाळी पूर्वी धान खरेदी केंद्र सुरू होईल असं आश्वासन राज्य सरकारकडून देण्यात आले होते. पण दिवाळी झाली तरी भंडाऱ्यात धान खरेदी केंद्र सुरु झाले नाही. त्यामुळे धान उत्पादक शेतकरी आता असंतोष व्यक्त करत आहेत.
राज्य सरकारने दिलेल्या आश्वासनानंतर शेतकऱ्यांना धान केंद्र सुरु होण्यास विश्वास होता. मात्र दिवाळी संपलेली आहे तरीसुद्धा जिल्ह्यातील एकही धान खरेदी केंद्र अद्याप तरी सुरू झालेला नाही. यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना धान खासगी व्यापाऱ्यांना द्यावे लागत आहे. यामुळे शेतकऱ्यांन दर देखील कमी मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात गेलेली असून त्यांच्या राज्य सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष पाहायला मिळत आहे.
धानाचा उत्पादन खर्च जास्त आहे परिणामी आता त्यातून उत्पन्न देखील चांगले येत नाही. यामुळे सरकारने आता खरेदी केंद्र सुरु करावे आणि बोनस द्यावा, अशी मागणी या भागातील धान उत्पादक शेतकरी करत आहेत. तसंच दिवाळी पण निघून गेली आहे. अजून पर्यंत केंद्र सुरू झाली नाहीत. लोकांच्या भरपूर समस्या आहेत. त्यामुळे लवकर केंद्र सुरू करण्यात यावी आणि लवकर बोनस दिला जावा, अशी प्रतिक्रिया एका शेतकऱ्याने दिली.
दरम्यान, सहकारी संस्थेत भरपूर अडचणी आहेत. तांत्रिक प्रॉब्लेम आहेत, कधी साईट चालू राहत नाही, यामुळे शेतकऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे.
Share your comments