सध्या दिवाळीची तयारी सर्वत्र सुरु आहे. ऐन दिवाळीत महागाईने सर्वसामान्यांना मोठी झळ बसणार आहे. ऐन दिवाळीत सर्व प्रकारची कडधान्य महागल्याची एक बातमी राष्ट्रवादी कॉंग्रेसने समाजमाध्यमावर ट्वीट केली आहे. किरकोळ बाजारात सुकामेवा, रवा, साखर, गुळ, मैदा, बेसन, पोहे, खोबरे आणि डाळींच्या दर किरकोळ बाजारात 35 ते 40 टक्के वाढले आहे.
दिवाळीसाठी लागणाऱ्या सर्व पदार्थाचे भाव 35 ते 40 टक्क्यांनी वाढल्याने फराळाच्या वस्तूही प्रचंड महाग झाल्या आहेत. रेडीमेड फराळाचे दरही किलोमागे 100 ते 120 रुपयांनी महागले आहेत. दोन महिन्यांपूर्वी किरकोळ बाजारात तुरडाळ 130 रुपये किलो होती, तीचा दर आला 190 रुपये किलोपर्यंत पोहचला आहे. मुगडाळीचा भाव 90 रुपयांवरून 130 रुपये झाला आहे. बेसन 80 रुपयांवरून 120 रुपये किलो झाले आहे. चणाडाळ दोन महिन्यांपूर्वी 70 रुपये किलो होती, आज तीचा दर 100 रुपये किलो आहे.
राष्ट्रवादी कॉंग्रेसने काय केले ट्वीट -
ऐन दिवाळीच्या तोंडावर सुकामेवा, रवा, मैदा, बेसन, पोहे, गुळ, साखर, खोबऱ्यासह डाळींच्या दरात ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली असून यंदाचा दिवाळीचा फराळ महागाईच्या विळख्यात सापडला आहे. त्यामुळे आधीच महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांचा जीव आणखी मेटाकुटीला येणार आहे. यावर सरकारने बघ्याची भूमिका न घेता वेळीच उपाययोजना केली पाहिजे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी आयातीपासून साठेबाजांवर कारवाई करण्याचे निर्णय त्वरेने घेतले तर सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळू शकतो.
Share your comments