वाहतूक पोलिसांना आयसीआयसीआय लोम्बार्डतर्फे रेनकोट, एन-95 मास्कचे वाटप

08 August 2020 07:05 PM By: भरत भास्कर जाधव

मुंबई  :  चातकाप्रमाणे सारे जण वाट पाहत असलेला मॉन्सून अखेर जोरदार बरसत आहे.  धुवाधार पावसामुळे मुंबईच्या अनेक भागात पाणी साचले आहे. यासह झाडे कोसळण्याच्या घटनेमुळे मालमत्तेचे नुकसानही झाले आहे. कोवीड-19 च्या संकटामुळे अतिरिक्त आव्हानांनी भरलेले यंदाचे वर्ष हे खरोखरच कठीण आहे. कोवीड आणि पाऊस यांचा अग्रक्रमाने सामना करत असलेल्या वाहतुक पोलिसांना सर्वाधिक कठीण स्थितीला तोंड द्यावे लागत आहे.

संकटाना झुंज देणाऱ्या या योध्दांना पाठबळ देण्यासाठी खासगी क्षेत्रातील अग्रगण्य विमा कंपनी असलेल्या आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्सने मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील वाहतूक पोलिसांना मदतीचा हात दिला आहे. या उपक्रमांतर्गत कंपनीने या ठिकाणी वाहतूक पोलिसांना सात हजार रेनकोट आणि पंधरा हजार मास्कचे वाटप केले आहे. त्यापैकी पाच हजार रेनकोट आणि दहा हजार मास्क मुंबई वाहतुक पोलिसांना देण्यात आलेले आहेत. पोलिसांना देण्यात आलेले मास्क हे जागतिक आरोग्य संघटनेने शिफारस केलेल्या एन 95 प्रकारातील असून ते वारंवार स्वच्छ करुन पुन्हा पुन्हा वापरता येतात. वाटप करण्यात आलेले रेनकोट हे 100 टक्के उच्च दर्जाच्या पॉलिस्टर फॅब्रिकपासून तयार करण्यात आलेले असून ते पुर्णपणे सीलबंद असल्याने वॉटरप्रूफ आणि आद्रतेवर मात करणारे आहे. त्यामुळे वाहतुक पोलिसांचे पावसापासून पुर्णपणे संरक्षण होणार आहे.

 


कंपनीच्या या उपक्रमाबद्दल बोलताना आयसीआयसीआय लोम्बार्डचे कार्यकारी संचालक (ईडी) संजीव मंत्री म्हणाले की, कोवीड-19 चे संकट सुरु असताना अचानकपणे कमी जास्त प्रमाणात कोसळणाऱ्या पावसाला तोंड देत वाहतूक सुरळीतपणे सुरू राहण्यासाठी हजारो वाहतुक पोलिस रस्त्यावर उतरुन आपली सेवा चोख बजावत आहेत.  ते चोवीस तास रस्ते वाहतुक सुरक्षा नियमांची अंमलबाजवणी करत असल्याने शहर कसे धावते राहील, याची पुरेपुर काळजी घेत आहेत. रस्ते सुरक्षेचे राखणदार असलेल्या या पोलिसांचे रक्षण करणे गरजेचे असल्याने आम्ही पुढे येत त्यांना रेनकोट आणि मास्कचे वाटप केले आहे. रस्ते सुरक्षेप्रती आमची असलेली नैसर्गिक वचनबध्दता कायम राहण्यासाठी आम्ही हा पुढाकार घेतलेला आहे.  त्यांच्या निरंतर सेवेप्रती आमच्या प्रेमाची हे छोटे प्रतीक असून त्यांच्या सेवेला आम्ही सलाम करतो, अशा शब्दात मंत्री यांनी वाहतुक पोलिसांचे कौतुक केले.

महाराष्ट्र पोलिस (वाहतुक) शाखेचे सहआयुक्त मंधुकर पांडे म्हणाले की, सर्वांची परिक्षा पाहणाऱ्या कोवीड-19 च्या संकटप्रसंगी मुंबई वाहतुक पोलिसांना पाच हजार रेनकोट आणि दहा हजार एन-95 मास्कचे वाटप करणाऱ्या आयसीआयसीआय लोम्बार्डला आम्ही धन्यवाद देतो. आयसीआयसीआय लोम्बार्ड रस्ते वाहतुक सुरक्षेला सदैव प्राधान्य देत असून विविध प्रसंगानुरुप अनेक उपाययोजनांना मदत केलेली आहे. सामाजिक उत्तरदायित्व योजेनंतर्गत “राईड टू सेफ्टी” कार्यक्रमात दुचाकीधारकांच्या सुरक्षेला पाठबळ दिले आहे. दुचाकीवर मागे बसुन प्रवास करणाऱ्या लहान मुलांच्या सुरक्षेसाठी त्यांना आयएसआय दर्जाचे विशेष डिझाईनचे हेल्मेट पुरविलेले आहे.

raincoat ICICI Lombard traffic police N-95 mask वाहतूक पोलिस आयसीआयसीआय लोम्बार्ड रेनकोट एन-95 मास्क
English Summary: Distribution of raincoat, N-95 mask by ICICI Lombard to traffic police

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.