1. बातम्या

राज्यात 67 लाख 14 हजार 740 क्विंटल अन्नधान्याचे वाटप

मुंबई: स्वस्त धान्य दुकानांमधून आतापावेतो 1 कोटी 54 लाख 71 हजार 728 शिधापत्रिका धारकांना 67 लाख 14 हजार 740 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
स्वस्त धान्य दुकानांमधून आतापावेतो 1 कोटी 54 लाख 71 हजार 728 शिधापत्रिका धारकांना 67 लाख 14 हजार 740 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांना या योजनेमधून सुमारे 20 लाख 40 हजार 842 क्विंटल गहू, 15 लाख 76 हजार 149 क्विंटल तांदूळ, तर 19 हजार 474 क्विंटल साखरेचे वाटप करण्यात आले. स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात अडकलेल्या सुमारे 8 लाख 39 हजार 181 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.

प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत दि. 3 एप्रिलपासून एकूण 1 कोटी 33 लाख 21 हजार 578 रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप करण्यात आले. या रेशनकार्ड वरील 6 कोटी 4 लाख 2 हजार 845 लोकसंख्येला 30 लाख 20 हजार 140 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले आहे.

शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 08 लाख 44 हजार 076 एपीएल केसरी कार्ड धारक लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यांसाठी प्रती व्यक्ती 5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे वाटप दि. 24 एप्रिल 2020 पासून सुरू होऊन आतापावेतो 77 हजार 610 क्विंटल धान्याचे वाटप केले आहे.

English Summary: Distribution of 67 lakh 14 thousand 740 quintals of foodgrains in the state Published on: 28 April 2020, 08:14 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters