1. बातम्या

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे खारीज करा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्तेवरील खोटे गुन्हे खारीज करावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने नितीन राजपुत यांच्या नेतृत्वामध्ये चिखली तहसीलदार यांना दि.२४. सप्टेबंर २०२१ रोजी निवेदन देण्यात आले.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे खारीज करा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांवरील गुन्हे खारीज करा

. मेहकर तालुक्यातील काही शेतकऱ्यांच्या दुय्यम निंबधक कार्यालयातील कामासंदर्भात श्री सुनिल चव्हाण दुय्यम निंबधक व लिपीक प्रमोद पाटील यांच्या बाबतीत तक्रारी प्राप्त झाल्यानंतर सदर शेतकऱ्यांच्या वातिने त्यांची कामे अडवून ठेवून पैशाची मागणी केलेल्या संबंधित कर्मचारी यांना याबाबत प्रमोद पाटील यांना जाब विचारला तर सदर दुय्यम निंबधक कार्यालयातील लिपीक प्रमोद पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे स्थानिक कार्येकर्ते सागर कानोडजे सह इतर दोन जणांना दि.२२.सप्टेबंर २०२१ रोजी मेहकर पोलिस स्टेशन येथे खोट्या गुन्हायात अडकवुन वरीष्ठाच्या दबावामुळे ही कार्यवाही केली

यावेळी महाराष्ट्रातील दुय्यम निंबधक कार्यालयातील कर्मचारी संपावार असतांना देखिल ही खोटी कार्यवाही केली.माञ शेतकऱ्यांच्या साठी पदाधिकारी घरावर तुळशीपञ ठेवून प्रमाणिकपणे लढत असतात माञ अशा खोट्या कार्यवाही करुन कार्यकर्तेंच्या मानसिक खच्चिकरण करुन मुजोर अधिकारी यांना पोलीस प्रशासन पाठशी घालत आहे.यापुढे शेतकऱ्यांच्यासाठी कुठल्याही कार्यालयातील कर्मचाऱ्यांना काहीच विचारपुस करायची नाही का.

समस्या घेऊन जायाचे नाही का त्यांच्या मनमानी कारभार चालु राहीला पाहीजे याला खतपाणी घालणे योग्य आहे का .तरी अशा बेशिस्त व कर्तव्यात कसुर करणा-या अधिकारी कर्मचारी यांची चौकशी करुन त्यांच्यावार सुध्दा कार्यवाही झाली पाहीजे व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्तेवरील खोटे गुन्हे तात्काळ खारीज करावे अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतिने जिल्हाभर आदोंलन करण्यात येईल असा इशारा देण्यात येत आहे.

सदर निवेदणाच्या प्रति

मा.जिल्हाधिकारी बुलढाणा मा.सहजिल्हानिंबधक श्रेणी १  

 कार्यालय बुलढाणा मा.पोलीस अधिक्षक बुलढाणा यावेळी नितीन राजपूत, विनायक सरनाईक, अनिल वाकोडे, रामेश्वर अंभोरे, सुधाकर तायडे,भारत खंडागळे,शुभम पाटील, प्रकाश तायडे व इतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

प्रतिनिधी - गोपाल उगले

 

English Summary: Dismiss the crimes against the activists of Swabhimani Shetkari Sanghatana Published on: 25 September 2021, 05:16 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters