सध्या शेतकऱ्याची वीज कनेक्शन पुन्हा एकदा तोडली जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. असे असताना आता एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका शेतकऱ्याने (Farmer) सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडीओ (Social Media Live Video) करत विष (Poison) प्राशन केल्याची घटना बीडच्या बीडच्या गेवराई तालुक्यातील मालेगाव बुद्रुक येथे घडली आहे.
नारायण वाघमोडे असे या शेतकऱ्याचे नाव आहे. रब्बीच्या पिकांना पाणी देण्याचे काम सुरु असतानाच महावितरणकडून (Mahavitaran) कनेक्शन बंद करण्यात आले. वीज (Electricity) बंद केल्याने पीके पाण्याअभावी जळत आहे. त्यामुळे या शेतकऱ्याने सोशल मीडियावर लाईव्ह व्हिडिओ करत विष प्राशन केलं आहे. यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे.
नारायण वाघमोडे यांच्या शेतातील वीज कनेक्शन कट करण्यात आले आहे. त्यामुळे डोळ्यासमोर पीके जळत असल्याने त्यांनी टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अतिवृष्टीमुळे हातात काहीच आली नाही. त्यामुळे किमान रब्बीत तरी काही हाती येईल म्हणून नारायण वाघमोडे यांनी पेरणी करून पीकं जगवली.
उगीच कोणी शेतकरीराजा म्हणत नाही!! शेतकरी घालतोय हार्ले डेव्हिडसनवर दूध, बघणारे गेलेत कोमात
त्यांनी व्हिडीओ करतांना विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या लाईव्ह व्हिडिओ पाहून गावातील काही तरुणांच्या प्रकार लक्षात आला. त्यामुळे त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांना बीडच्या एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
ब्रेकिंग! पिंपरी चिंचवडचे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन
दरम्यान, राज्यात महावितरणकडून थकीत वीज बिलापोटी सक्तीची कारवाई सुरु आहे. सक्तीची वीज बिल वसुली न करता, कोणत्याही शेतकऱ्याचे थेट वीज कनेक्शन खंडीत करू नयेत असे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मात्र असे असतांना देखील अनेक ठिकाणी सक्तीची वीज बिल वसुली सुरूच आहे. यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.
महत्वाच्या बातम्या;
बारामतीत सुरू होतेय नवीन कृषिपर्व! वॉशिंग्टन नंतर जगातील दुसरे संशोधन केंद्र बारामतीत, शरद पवार, ऑक्सफर्डचे संचालक उपस्थित
समृद्धी महामार्गाची खरी कहाणी! आलिशान गाड्या, कोट्यावधीचे बंगले आणि बक्कळ पैसा, शेतकरी मालामाल
जमिनीचा ताबा मिळावा म्हणून स्वतःलाच जमिनीत गाडून घेतले, शेतकऱ्याचे अनोखे आंदोलन
Share your comments