1. बातम्या

सात कोटी रुपये प्रति हेक्टरी द्यावे;नाशिक पुणे रेल्वे मार्ग प्रकल्पातील बाधित शेतकऱ्यांची मागणी

नाशिक पुणे रेल्वे मार्गातील बाधित शेतकऱ्यांना पुण्याच्या धर्तीवर हेक्टरी सात कोटी रुपयांचा दरमिळावा अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
nashik pune railway line project land aquire

nashik pune railway line project land aquire

नाशिक पुणे रेल्वे मार्गातील बाधित शेतकऱ्यांना पुण्याच्या धर्तीवर हेक्‍टरी सात कोटी रुपयांचा दरमिळावा अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे.

तसेच प्रकल्पासाठी समान दर ठेवावा, त्यासोबत गोदावरी उपसा जलसिंचन योजनेचा बोजा अन्या जमिनीवर ठेवावा. त्याचे पैसे या मधून कापून घेऊ नयेत अशा आशयाची मागणी बाधित शेतकऱ्यांनी केली.यासंबंधीची बैठक नाशिक तहसील कार्यालयात पार पडली. जिल्हा भूसंपादन अधिकारी वासंती माळी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस प्रकल्पाचे अतिरिक्त मुख्य व्यवस्थापक सचिन कुलकर्णी, तहसीलदार राहुल कोकाटे उपस्थित होते.

नक्की वाचा:46 कारखान्यांची धुराडी बंद; शिल्लक ऊसाचे काय?

झालेल्या या बैठकीमध्ये भूसंपादन अधिकारी वासंती माळी यांनी शेतकऱ्यांना त्यांच्या अडचणी मांडण्याच्या सूचना केल्या. रेडी रेकनर दराप्रमाणे जमिनीचे मूल्यांकन करण्यात आली असल्याची माहितीदेखील त्यांनी दिली. या प्रकल्पामध्ये बाधित जमिनीतील झाडे व इतर मालमत्तांच्या मूल्यांकन दोन दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे.

त्यानंतर या संबंधीचे बैठक पुढच्या आठवड्यात देण्याचे आश्वासन देखील माळी यांनी दिले. जर काही शेतकऱ्यांच्या व्यक्तिगत स्वरूपाच्या अडचणी असतील तर त्यांनी त्या स्वतंत्रपणे अर्ज करून मांडण्याच्या सूचना देखील त्यांनी केल्या. या प्रकल्पात बाधित झालेल्या शेतकऱ्यांना जाहीर झालेला दर समृद्धी महामार्गाच्या तुलनेत खूपच कमी आहे.

नक्की वाचा:1 टन उसापासून मिळवा 25 हजारांचे उत्पादन, या पदार्थाची निर्मिती ठरेल ऊसउत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान

चार वर्षांपूर्वी दिलेला दर देखील जास्त आहे त्यामुळे शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या नोटीस प्रमाणे विहित जमीन व पोटखराबा दरात फरक आहे. 

त्या पद्धतीचा कुठलाही फरक न धरता एकसमान दर देण्यात यावा. पुणे येथे देखील शेतकरी शेतीच करतात इकडे ही तेच आहे त्यात कुठलाही प्रकारचा फरक करू नये अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. या सगळ्या मागण्यांचे निवेदन शेतकऱ्यांनी भूसंपादन अधिकारी वासंती माळी यांना दिले.

English Summary: dimand to 7 crore rupees per hector in nashik pune railway route by project interrupted farmer Published on: 19 April 2022, 11:52 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters