स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त बारामती तालुक्यात डिजीटल स्वाक्षरित ७/१२ वाटपाच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, अपर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, एकात्मिक विकास समन्वय व पुनर्विलोकन समितीचे अध्यक्ष संभाजी होळकर, तहसिलदार विजय पाटील उपस्थित होते.
महसूल विभागाने ५० वर्षानंतर ७/१२ उपलब्ध करून देण्याचा पद्धतीत बदल केले आहेत. महसूल अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी यासाठी केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकसमानता आणण्यासाठी हा डिजिटल ७/१२ चा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. याबरोबरच शासनाने ई-पीक पाहणी ॲप विकसित केले आहे. या ॲपचा फायदा शेतकऱ्यांनी करुन घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी श्री. पवार यांच्या हस्ते बारामती तालुक्यातील दहा खातेदारांना मोफत डिजिटल सातबाराचे वाटप करण्यात आले. तसेच दोन लाभार्थ्यांना राष्ट्रीय कुटुंब लाभ अर्थसहाय्य योजनेतून 20 हजार रुपयांचे धनादेशचे वाटप करण्यात आले.उपविभागीय अधिकारी कांबळे यांनी प्रस्ताविकात नव्या उपक्रमाची माहिती दिली. बारामती तालुक्यात खातेदार संख्या १ लाख ४२ हजार ३०६ व एकूण सातबारा संख्या ८२ हजार ७२१ आहे. डिजिटल ७/१२ वाटपाची मोहिम आजपासून ९ ऑक्टोबर पर्यंत राबविण्यात येणार आहे असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष अभिजीत जाधव, महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता सुनिल पावडे, मुख्याधिकारी महेश रोकडे, गटविकास अधिकारी अनिल बागल, कार्यकारी अभियंता अनिल ढेपे, उपकार्यकारी अभियंता राहूल पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे, निवासी नायब तहसिलदार विलास कारे आदी उपस्थित होते.
प्रतिनिधी- गोपाल उगले
Share your comments