भारत हे औषधी वनस्पती साठी जगभरात एक केंद्र मानले जाते. भारतात मिळणाऱ्या औषधी वनस्पती हे जगात प्रसिद्ध आहेत. भारतामध्ये या वनस्पतींच्या 49 हजार पेक्षा अधिक प्रजाती सापडतात. यामध्ये 16 हजार प्रजाती या फुले येणारे आहेत. भारतामध्ये मिळणार या सगळ्या औषधी वनस्पतींच्या वैज्ञानिक अभ्यासाद्वारे माहिती मिळाली आहे की जवळजवळ तीन हजार पेक्षा जास्त वनस्पती या औषधी गुणांनी युक्त आहेत.
ज्यांचा वापर हा पारंपारिक उपचारामध्ये केला जातो. परंतु या महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर औषधी वनस्पती नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत.
याचे महत्त्वाचे कारण म्हणजे वनस्पतींचे नैसर्गिक परिस्थिती चा नाश,वाढते शहरीकरण, रासायनिक खतांचा अनियंत्रित वापर, माती, वायु, पाण्याचे प्रदूषण तसेच प्लास्टिकचा बेसुमार वापर, उद्योगधंद्यांची संख्येत प्रचंड प्रमाणात वाढ अशा बर्याच कारणांमुळे या औषधी वनस्पतींच्या जाती नामशेष होत आहेत. या समस्येवर उपाय म्हणून या जातींची ओळख आणि संरक्षणाच्या हेतूने बीएचयू ने केक ॲप लॉन्च केले आहे जे या औषधी वनस्पतींची वास्तविक परिस्थितीवर नजर ठेवेल. या ॲपचे नाव आहे हाइपरस्पेक्ट्रल डिजिटल लायब्ररी ॲप. या लेखात आपण या विषयी माहिती घेऊ.
हाइपरस्पेक्ट्रल डिजिटल लायब्ररी ॲप
हे देशातील पहिले डिजिटलॲप आहे की ज्याद्वारे मोबाईल फोनच्या माध्यमातून औषधी वनस्पतींचे अचूक लोकेशन चामॅप उपलब्ध होईल. त्यासोबतच संबंधित औषधी वनस्पतीचे स्वास्थ्य विषयक परिस्थितीची सुद्धा माहिती देईल. म्हणजे त्याद्वारे संबंधित वनस्पतींची देखरेख व्यवस्थित केली जाईल व त्याचे योग्य व्यवस्थापन होईल. हे ॲप हिमालय क्षेत्रातील जैवविविधतेच्या संरक्षणासाठी महत्वपूर्ण सिद्ध होईल.
या ॲपचे फायदे
या ॲपच्या मदतीने भारतातील वैज्ञानिकांना औषधी वनस्पतींच्याशोधामध्ये कुठे जायची गरज पडणार नाही.
वैज्ञानिक या तंत्रज्ञानाच्या मदतीने वनस्पतींचे व्यवस्थित व्यवस्थापन आणि संरक्षण करू शकतील. सोबतच त्यांचा पैसा आणि वेळही वाचेल.
औषधी वनस्पतींची लायब्ररी बनवण्यासाठी लागले तीन वर्ष
स्पेक्ट्रल टूल ऑफ हिमालय रेयर इन्व्हेंटिव्हमेडिसिनल अँड इकॉनोमिकल प्लांट स्पेसिसनावाच्या या लायब्ररी ला बनवण्यासाठी जवळजवळ तीन वर्ष लागले. या लायब्ररी ला पर्यावरण, वन आणि जलवायू परिवर्तन मंत्रालयाचे मिशन ओन हिमायनस्टडीज द्वारा विकसित केले गेले आहे.
Share your comments