शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सध्या शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. आता शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात आम्ही आंदोलन करत असताना शिंदे गटातील नेत्यांकडून काहीही बोलवले जात आहे. मुख्यमंत्रीही शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष देत नाहीत. या शिंदे गटातील नेते गुलाबराव पाटील हे गुवाहाटीला शेण खायला गेले होते का? अशी टीका शेतकरी संघटनेने केली आहे.
तसेच एकनाथ शिंदे यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सरपंच झालाय. ज्याप्रमाणे सरपंच याला फोन लाव, त्याला फोन लाव, नालीत पाणी गेले की फोन लाव, तसेच आपले मुख्यमंत्री करत असतात. असेही ते म्हणाले.
आपले मुख्यमंत्री तर थानेदारालाही फोन लावतात. मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या पदाची गरिमा घालविली आहे, अशी टीका तुपकरांनी केली. दरम्यान, रविकांत तुपकर आणि त्यांचे सहकारी अकोला तुरुंगातून बाहेर आल्यावर त्यांचे ठिकठिकाणी धुमधडाक्यात स्वागत केले जात आहे. तुपकर हे काल बुलढाण्यात पोहोचले. तेव्हा कार्यकर्त्यांनी फटाके फोडत, अंगावर फुलांचा वर्षाव करत आणि घोषणा देत तुपकर यांचं जल्लोषात स्वागत केलं.
शेतकऱ्यांनो उन्हाळी भेंडी लागवड तंत्रज्ञान जाणून घ्या..
त्यानंतर तुपकर यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापासून ते गुलाबराव पाटील यांच्यापर्यंत सर्वांवर टीका केली. गुलाबराव पाटील यांनी तूपकर यांच्या आंदोलनाला नौटंकी आंदोलन म्हटले होते. गुलाबराव पाटील यांच्या या वक्तव्याचा तुपकर यांनी तुरुंगातून बाहेर पडताच कडक शब्दात समाचार घेतला.
गुलाबराव पाटील तुमचे घर काचेचे आहे. तुम्ही गुवाहाटीला शेण खायला गेले होते का?, अशी जोरदार टीका तुपकर यांनी केली. ज्या बाळासाहेब ठाकरे यांनी पानटपरी चालवणाऱ्या गुलाबराव पाटील यांना अनेकवेळा मंत्री केले, त्यां ठाकरे कुटुंबासोबत तुम्ही गद्दारी केलीय. जे उपकार करणाऱ्या ठाकऱ्यांचे झाले नाहीत, त्यांनी आम्हाला शिकवू नये. योग्यवेळी तुम्हाला जशास तसे उत्तर देऊ, असेही तुपकर यांनी म्हटले आहे.
महत्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांनो 'या' पद्धतीने पेरूची लागवड करा, कमी वेळात जास्त उत्पन्न मिळेल
टोमॅटोचे प्रगत वाण, कमाल उत्पादन क्षमता 900 क्विंटल प्रति हेक्टर
तैवानच्या टरबूजाच्या शेतीतून 4 महिन्यांत 60 लाखांची कमाई, जाणून घ्या शेतीची पद्धत
Share your comments