1. बातम्या

Dhan Kharedi : धान खरेदीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

मागील हंगामाच्या तुलनेत राज्यात अद्यापपर्यंत कमी धान खरेदी झाली आहे. याचा विचार करता शासनाने दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी दि. 31 मार्च 2024 रोजीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याचा फायदा राज्यातील लाखो नोंदणीकृत शेतकऱ्यांना होणार आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

Dhan Kharedi News

Dhan Kharedi News

मुंबई : खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास शासनाने 31 मार्च 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शासनाने शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार राज्यात धान खरेदी करण्याची मुदत 31 जानेवारी 2024 पर्यंत होती.

मागील हंगामाच्या तुलनेत राज्यात अद्यापपर्यंत कमी धान खरेदी झाली आहे. याचा विचार करता शासनाने दि. 28 फेब्रुवारी 2024 रोजी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी दि. 31 मार्च 2024 रोजीपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याचा फायदा राज्यातील लाखो नोंदणीकृत शेतकऱ्यांना होणार आहे, असे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागातर्फे कळविण्यात आले आहे.

5 मार्च 2024 पर्यंत अनाथ पंधरवडा

मुंबई जिल्ह्यात अनाथ बालकांसाठी 5 मार्च 2024 पर्यंत अनाथ पंधरवडा साजरा करण्यात येत आहे. पात्र बालकांना अनाथ प्रमाणपत्र देण्यासाठी आवश्यक कागदपत्रांची पुर्तता व्हावी याकरिता मुंबई जिल्हा महिला व बालविकास कार्यालयात समर्पित कक्षाची स्थापना करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी शोभा शेलार यांनी दिली.

अनाथ मुलांना शासनाच्या विविध सवलतींचा लाभ घेता यावा, याकरिता महिला बालविकास विभागामार्फत अ, ब व क, प्रवर्गातून अनाथ प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत आहे. यासाठी अर्जदाराच्या आई व वडीलांचा मृत्यु दाखला, अर्जदाराचा जन्म दाखला, नगरसेवक यांचा बालकांचे अनाथ प्रमाणपत्र सिद्ध करण्यासाठी दाखला, रहिवासी दाखला, आधारकार्ड, जात प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र, बोनाफाईड, फोटो कॉपी आदी कागदपत्रे अनाथ बालकांना पंधरवड्यात मिळवून देण्यासाठी संबंधित यंत्रणा कार्यान्वित आहे, असेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांनी कळविले आहे.

English Summary: Dhan Kharedi Extension of date for purchase of paddy March 31 rice Published on: 28 February 2024, 08:17 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters