नाशिक जिल्ह्यात (In Nashik district) मोठ्या प्रमाणात खरीप हंगामातील लाल कांद्याची (Red onion of kharif season) तसेच रब्बी हंगामातील उन्हाळी कांद्याची लागवड बघायला मिळते. जिल्ह्यात सध्या खरीप हंगामातील लाल कांद्याची काढणी सुरू आहे, आणि शेतकरी बांधव लाल कांदा विक्रीसाठी बाजार समितीत दाखल होताना दिसत आहेत. अशातच, ऐन काढणीच्या तोंडावर शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे, ती म्हणजे देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीतुन (Deola Agricultural Produce Market Committee).
कसमादे पट्ट्यातील एक महत्त्वाची बाजारपेठ म्हणून देवळा कृषी उत्पन्न बाजार समिती ओळखली जाते. देवळा तालुक्यातील तसेच आजूबाजूच्या परिसरातील अनेक कांदा उत्पादक शेतकरी या बाजारपेठेवर अवलंबून असतात. देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीने नुकताच एक ऐतिहासिक निर्णय घेतल्याचे समोर येत आहे, देवळा येथील सर्व कांदा खरेदीदार व्यापाऱ्यांनी आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बाजार समितीतील कर्मचाऱ्यांच्या देखरेखेखाली कांदा विक्रीचे पैसे रोकड देण्याचे ठरवले आहे (It is decided to pay cash for the sale of onions). देवळा कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या या निर्णयामुळे परिसरातील शेतकऱ्यांना नक्कीच दिलासा मिळणार आहे, तसेच कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पैसे मिळवण्यासाठी पायपीट करण्याची आता आवश्यकता राहिली नाही.
शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, देवळा बाजार समितीत याआधी देखील कांदा विक्री केल्यानंतर 24 तासाच्या आत शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे पैसे देण्यात यावे असा निर्णय घेतला गेला होता. मात्र या निर्णयाची अंमलबजावणी (Implementation) पाहिजे तशी बघायला मिळत नव्हती जेव्हा ही बाब बाजार समिती प्रशासनाच्या लक्षात आली, मात्र शेतकरी बांधवांकडून यासंबंधी कुठलीच तक्रार बाजार समितीला प्राप्त होत नव्हती त्यामुळे बाजार समिती व्यापाऱ्यांवर कारवाई देखील करु शकत नव्हती. शेतकरी बांधव आणि व्यापाऱ्यांचे वर्षानुवर्षे होत असलेल्या व्यवहारामुळे जवळीक निर्माण झाली होती, शिवाय शेतकरी बांधव अधिकचा दर मिळेल या लालसेपोटी पैसे 24 तासाच्या आत मिळत नसले तरी याची तक्रार बाजार समितीत करताना दिसत नव्हते.
अखेर बाजार समितीच्या बैठकीत झाला हा निर्णय
शेतकरी बांधव रोकड पैसे मिळत नसले तरी याची तक्रार बाजार समितीत करत नव्हते, मात्र असे असले तरी, देवळा बाजार समितीत कांदा विक्रीचे पैसे वेळेवर मिळत नाहीत अशी बातमी पंचक्रोशीत वेगाने पसरू लागली. यामुळे अनेक कांदा उत्पादक शेतकरी देवळा बाजार पेठेपासून स्वतःला विलिप्त करू लागले त्यामुळे देवळा बाजार समितीत कांद्याची आवक मंदावताना दिसत होती. बाजार समितीने वारंवार याबाबत व्यापाऱ्यांना सूचना दिल्या होत्या तसेच शेतकरी बांधवांना देखील या संदर्भात सूचना दिल्या गेल्या होत्या. शेवटी बाजार समितीने जातीने लक्ष घालून यावर तोडगा काढण्याचा निर्णय घेतला त्या अनुषंगाने बाजार समितीचे सभापती केदा आहेर यांच्या अध्यक्षतेखाली 31 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांना कांदा विक्रीचे सर्व पैसे रोकड स्वरूपात दिले जावेत असा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. बाजार समितीच्या या निर्णयामुळे देवळा परिसरातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे एवढे नक्की.
Share your comments