राज्य शासनाने मार्च,एप्रिल आणि मे2021 मध्ये झालेल्या नुकसानीचा जी आर 6 ऑक्टोबर 2021 ला काढला यावरून राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर टीका केली.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई साठी एकरी 50 हजार रुपयांची मागणी करणारे सरकार आता मदतीसाठी हात का आखडता घेत आहे? असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यात विदर्भ, मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे शेती मालाचे व शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तातडीने मदत जाहीर करण्यात यावी अशी मागणी देवेंद्र फडणीस यांनी केली आहे.
राज्य सरकारने जुलै 2021 च्या मदतीची भरघोस घोषणा केली आहे.. यामध्ये नागपूर विभागातील सहा जिल्हे मिळून फक्त दहा कोटी रुपये आणि संपूर्ण नाशिक विभागातील पाच जिल्ह्यांत मिळून फक्त एक लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे.म्हणजेनाशिक विभागातील एका जिल्ह्याच्या वाट्याला वीस हजार रुपये मदत करण्यात आल्यामुळे फडणवीस यांनी संताप व्यक्त केला आहे.
शेतकऱ्यांना मदतीच्या वेळी सरकारचा होतो कासव
वसुलीसाठी धावणारे सरकार शेतकऱ्यांच्या मदतीचा विषय आला की महा विकास आघाडी सरकारचा कासव होतो. विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुराने बाधित शेतकऱ्यांना मदतीची प्रतीक्षा आहे. परंतु सहा ते आठ महिने मदतीचे आदेश जर निघत नसतील, तर प्रत्यक्ष मदत केव्हा पोहोचणार? असा प्रश्न देखील फडणवीस यांनी उपस्थित केला आहे.
Share your comments