सध्या राज्याच्या विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून यामध्ये महा विकास आघाडीने घोषित केलेल्या कर्जमाफीवरून विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणीस यांनी प्रश्न विचारले.तेव्हा या प्रश्नाला उत्तर देताना अजित पवारांनी एक मोठी घोषणा केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की,देवेंद्र फडणवीस यांनी काही प्रश्न उपस्थित केले जसे की,राज्य सरकारच्या अर्थसंकल्पातील पुरवणी मागण्यांना कशाप्रकारे पैसे दिले आहेत.मात्र शेतकरी कर्जमाफी ला पैसे नाहीत असे सांगितले जात आहे. सरकारच्या मनात पैसे देण्याचे नाही. इतर गोष्टींना दोन वर्षांनी जर पैसे दिले तरी चालतील.स्मारकांना,याला त्याला पैसे देतात परंतुशेतकऱ्यांच्या कर्ज माफी योजनेलापैसे देता येत नाहीत.जर तुम्ही पैसे देणार असाल तर पैसे कधी देणार, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना व दोन लाखांवरील कर्ज असलेल्या शेतकऱ्यांना लाभ केव्हा मिळणार? त्यांना कर्जमाफी झाली त्यांना बँक कर्ज का देत नाहीत त्यांना बँकांकडून कर्ज मिळण्यासाठी राज्य सरकार काय करणार? असे अनेक प्रश्न फडणवीस यांनी उपस्थित केले. याला उत्तर देतानाअजित पवार म्हणाले की,उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर कर्जमाफीची घोषणा केली होती.
यामध्ये दोन लाखा खालील,दोन लाखांवरील आणि नियमित कर्ज भरणाऱ्यांचा समावेश होता. मात्र मार्च मध्ये कोरोना संकट आले व परिस्थिती थोडीशी गंभीर झाली.. याबाबतीत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून नियमित कर्ज भरणाऱ्यांना 50000 प्रोत्साहनपर अनुदान व दोन लाखाच्या पुढील कर्ज धारकांच्या कर्जमाफीच्या प्रश्नांपैकी एक प्रश्न एका वर्षात सोडवला जाईल व त्याच्या पुढच्या वर्षी दुसरा प्रश्नसोडविण्यात येईल हा शब्द मी सभागृहात देतो असं अजित पवार म्हणाले.तसेच ज्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे अशांनाबँकेत पुन्हा कर्ज मिळावे यासाठी सर्व जिल्हा सहकारी बँक, जिल्हा बँका व राष्ट्रीयीकृत बँकांना कळवू.
तसेच जिल्हाधिकारी व मुख्यमंत्र्यांच्या ही बैठक आतून संबंधित विभागांना निर्देश देण्यात येतील.शिवायबँकातून तीन टक्के व्याज दराने पीक कर्ज आपण उपलब्ध करून देतो.त्यासाठी 950 ते 960 कोटी रुपये खर्च करतो.तसा पद्धतीने खर्च करण्याची राज्य सरकारची तयारी असल्याचे देखील अजित पवार यांनी म्हटले.
Share your comments