ऐन उन्हाळ्याचे दिवस सुरु झाले असून तीव्र उन्हाच्या झळा लागून गळ्याला सोक पडत आहे. राज्यात अनेक ठिकाणी वाढत्या तापमानामुळे (Temperature) पिण्याचा (Water) आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊन बसला आहे. त्यामुळे सोलापूर (Solapur) जिल्ह्यातील मोहोळ तालुक्याच्या देवडी गावाला आष्टी उपसा सिंचन योजनेतून पिण्यासाठी व शेतीसाठी पाणी मिळावे अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
त्याबाबत सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले जावेत अशी मागणी करणारे लेखी निवेदन देवडी गावचे सरपंच व उपसरपंच यांनी पवारांना दिले. देवडी गावाजवळुन आष्टी उपसा सिंचन योजनेचा कालवा गेला असून आष्टी उपसा सिंचन योजनेतून परिसरातील पाझर तलाव, लहान बंधारे भरून दिल्यास गावची पाणी समस्या सुटण्यास मदत होणार असल्याचे म्हणणे येथील शेतकऱ्यांचे आहे. तर पावसाळ्यात उजनी धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जाते.
राजू शेट्टींचा शरद पवार आणि नितीन गडकरी यांच्यावर जोरदार घणाघात, म्हणाले...
तेच पाणी आष्टी तलावात सोडून देवडी गावच्या परिसरात आल्यास पाणी प्रश्न मार्गी लागणार असल्याचा विश्वास येथील शेतकऱ्यांना वाटत आहे. या योजनेत पूर्वी देवडी गावचा समावेश होता परंतू प्रशासकीय पातळीवरून कुठलाही प्रतिसाद न मिळाल्याने तो प्रश्न मागे पडल्याचे गावकरी सांगत आहेत.
आनंदाची बातमी : आमिर खान यांनी 'सत्यमेव जयते फार्मर कप' ची केली घोषणा; शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
देवडी गावाला नियमित पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पावसाळा सोडला तर गावातील शेती पिकवणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. त्यामुळे येथील शेतकरी हतबल झाला असून गाव सोडून लोक जाऊ लागले आहेत. त्यामुळे आष्टी उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळाले तर हे क्षेत्र संपूर्ण बागायती होईल असा विश्वास गावच्या शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.
पावसाळ्याच्या जीवावर पिक घेऊन त्यावरच समाधान येथील शेतकऱ्यांना मानावे लागत आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जनावरे सांभाळणे येथील शेतकऱ्यांना जिकिरीचे होऊन बसले आहे. गावाला पाणी नसल्याने अनेक गावकरी शहराकडे स्थलांतरीत झाले आहेत. तसेच अद्याप देखील होत आहेत. काही शेतकरी शेती पिकवण्या ऐवजी दुग्ध व्यवसाय करत आहेत. मात्र, जनावरांना पिण्यासाठी लागणारे पाणी देखील मुबलक प्रमाणात उपलब्ध नसल्याने तोही व्यवसाय अडचणीत आला आहे.
कृषी यांत्रिकीकरणाला चालना देण्यासाठी आता कृषी यंत्रावर मिळणार अनुदान
Share your comments