1. बातम्या

ग्राम बीजोत्पादन मोहिमेच्या माध्यमातून कृषी विभागाने गोळा केली ३० लाख क्किंटल सोयाबीन बियाणे

मागच्या वर्षी आपण पाहिले की सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर अनेक ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या की, टाकलेली बियाणे उगवलेच नाही. सोयाबीनची पेरणी ही वेळ वर, तसेच योग्यप्रकारे मशागत घेऊन केली गेली होती. तरी सोयाबीन बियाणे उगवण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
ग्राम बीजोत्पादन मोहीम

ग्राम बीजोत्पादन मोहीम

मागच्या वर्षी आपण पाहिले की सोयाबीनची पेरणी झाल्यानंतर अनेक ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात तक्रारी आल्या होत्या की, टाकलेली बियाणे उगवलेच नाही. सोयाबीनची पेरणी ही वेळ वर, तसेच योग्यप्रकारे मशागत घेऊन केली गेली होती. तरी सोयाबीन बियाणे उगवण्याच्या प्रक्रियेत अनेक अडचणी आल्या. बहुसंख्य बियाणे उगवलेच नाही.याची दखल शासनाला आणि न्यायालयाला सुद्धा घ्यावी लागली होती. याच्यावर उपाय म्हणून कृषी विभागाने यावर्षी ग्राम बीजोत्पादन मोहिम हाती घेतली. या मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळाला असून जवळजवळ तीस लाख क्विंटल सोयाबीनचे बियाणे उपलब्ध झाले आहे.

जर महाराष्ट्राचा विचार केला तर जवळजवळ 40 लाख हेक्‍टरवर सोयाबीनची पेरणी केली जाते. त्यासाठी अनुमानाने 11 लाख 35 हजार क्विंटल  सोयाबीनचे बियाणे लागते. या लागणारे बियाणे पैकी 50 टक्के बियाणे महाबीज व राष्ट्रीय बियाणे महामंडळ कडून पुरवले जाते आणि उरलेले 50 टक्के शेतकरी स्वता कडील  बियाणे वापरतात. परंतु मागच्या वर्षी सोयाबीनची उगवण व्यवस्थित न झाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. या बाबतीतल्या तक्रारी मोठ्या प्रमाणात संबंधित विभागांकडे प्राप्त झाल्या होत्या.

या सगळ्या गोष्टींची दखल घेऊन कृषी मंत्री दादा भुसे यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सोयाबीन तज्ञ  यांची चौकशी समिती नेमली. ज्या ठिकाणी महाबीज चे बियाणे उगवले नाही येथे पर्याय बियाणे देण्याचे आदेश दिले गेले. सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता आणि 60 टक्के अपेक्षित असताना फक्त पंचवीस टक्के बियाणे उगवण्याचे प्रयोगशाळेत निष्पन्न झाले होते. हा सगळा गतवर्षीचा अनुभव पाहता आणि सोयाबीन यांची उपरोक्त अडचण लक्षात घेऊन राज्याच्या कृषी विभागाने ग्राम बीजोत्पादन मोहीम व शेतकऱ्यांनी घरचे राखून ठेवलेली बियाण वापरात आणण्याची मोहीम हाती घेतली. सोयाबीन बियाण्याचे वैशिष्ट्य असे आहे की ते तीन वेळेस वापरता येते. या मोहिमेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी स्वतः कडील  बियाणे वापरावे, तसेच तसेच आलू बियाणे राखून ठेवावे आणि ज्या शेतकऱ्यांना बियाण्याची गरज असेल त्यांना ते पुरवावे.

 

कृषी विभागाने या सगळ्या योजनेचे गाव पातळीवर चांगल्या पद्धतीने नियोजन केले आहे. या योजनेच्या माध्यमातून गावातील कृषी सहायकांनी शेतकऱ्यांकडील उपलब्ध बियाण्याच्या वान आणि त्याच्या नोंदी संकलित केल्या. तसेच सदर नोंदी या जिल्हापातळीवर आणि त्यातून कृषी आयुक्त कार्यालय पर्यंत संकलित केले गेले याचा फायदा असा झाला की चालू हंगामात गरजेपेक्षा जास्त बियाणे उपलब्ध झाले. सोयाबीनचे दर वाढल्याने यंदा राज्यातील सोयाबीन पिकाखालील क्षेत्र वाढण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. जवळजवळ 43 लाख हजार हेक्‍टर क्षेत्र होण्याचा अंदाज असून असून त्यासाठी 32 लाख 62 हजार क्विंटल बियाणे आवश्‍यक आहे.

 

ग्राम बीजोत्पादन मोहिमेअंतर्गत जे शेतकरी निवडले आहेत त्यांची संख्या जवळपास तीन लाख 11 हजार असून त्यांच्यासाठी जे क्षेत्र पाच लाख 77 हजार हेक्टर आहे. ग्राम बिजोत्पादन मोहिमेच्या अंतर्गत शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेले बियाणे हे जवळजवळ 29 लाख 87 हजार क्विंटल आहे. हा साठा शेतकरी स्वतःसाठी वापरतील आणि उरलेला साठा  शेतकरी  शेतकऱ्यांना विक्री करतील अशा प्रकारचे नियोजन आहे. याचा फायदा असा झाला की शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे मिळवून होणाऱ्या त्रासापासून शेतकरी  वाचू शकता.

English Summary: Department of Agriculture collects 3 million quintals of soybean seeds through Village Seed Production Campaign Published on: 28 May 2021, 01:38 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters