औरंगाबाद जिल्ह्यातील असलेल्या कन्नड तालुक्यात विहिरीचे प्रस्ताव मंजूर करण्यासाठी काही पंचायत समिती सदस्यांनी शेतकऱ्यांकडून पैसे घेतले आहेत. ते घेतलेले पैसे परत करण्याचा इशाराकन्नड चे माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी दिला आहे.
तसे न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा देखील त्यांनी सांगितले आहे.यासंबंधीचा आरोप पंचायत समिती सदस्य वर अगोदर देखील करण्यात आला आहे. याप्रकरणी जाधव या आक्रमक झाले असून 22 मार्च पर्यंत अधिकारी तसेच पंचायत समितीच्या सदस्यांनी शेतकऱ्यांचे पैसे परत करावेत अन्यथा कार्यालयात घुसून सदस्यांचे पुतळे जाळण्यात येतील असा इशाराच जाधव यांनी दिला आहे.
सविस्तर प्रकरण पाहू
कन्नड तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत असलेल्या शेतकऱ्यांना विहिरी मंजूर करण्यासाठी पंचायत समितीच्या सदस्यांनी पैसे घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे. एवढेच नाही तर त्यावेळच्या गटविकास अधिकाऱ्यांनी देखील हे प्रकरण बोगस असल्याचे म्हटले होते. त्यामुळे सदस्य व गट विकास अधिकारी यांच्या मधील वाद पुढे आला होता.
या प्रकरणांमध्ये गटविकास अधिकारी यांची देखील बदली करण्यात आली होती मात्र नवीन प्रभारी गटविकास अधिकाऱ्यांनी देखील विहिरींचे प्रस्ताव मंजूर केले नाहीत. मात्र आता पंचायत समितीच्या सदस्यांवर शेतकऱ्यांचा दबाव वाढत असून 14 मार्च रोजीकन्नड पंचायत समितीवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे.
त्यामुळे सदस्यांचा कार्यकाळ देखील संपत आहे. यामध्ये मग्रारोहयो योजनेच्या अंतर्गत 1165 विहिरींचे प्रस्ताव दाखल झाले आहेत यापैकीपन्नास टक्क्यांहून अधिक प्रस्ताव बोगस असल्याचा आरोप आहे. यापैकी फक्त 22 लाभार्थ्यांना विहिरी मंजूर झाले आहेत.
यासाठी लाभार्थीचे नाव पंचायत समितीच्या कृती आराखडा मध्ये आणि लेबर बजेट मध्ये असणे आवश्यक आहे परंतु बऱ्याच शेतकऱ्यांनी विहिरी असताना देखील ही माहिती लपवून ठेवल्याने विहिरी नसल्याचे दाखवले आहे.या विहिरीच्या मंजुरीसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार झाल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात आहे.
( संदर्भ-Tv9मराठी)
Share your comments