शेतकऱ्यांच्या हातातून आगोदरच खरीप हंगाम पूर्णतः चालला गेलेला आहे. झालेल्या अति पावसामुळे खरीप हंगामातील सगळ्या पिकांचे नुकसान झाले आहे. अशाही परिस्थितीत शेतकऱ्यांनी रब्बी हंगामाची तयारी पूर्ण केली व पेरण्या पूर्ण केल्या परंतु या पार्श्वभूमीवर यावेळी अवकाळी आणि इतर निसर्गाच्या लहरीपणामुळे रब्बी पिके देखील धोक्यात आले आहेत.
हे संकट कायम असतानाच कृषी पंपांना वरील थकबाकीमुळे थेट कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आणखी एक संकट उभे राहिले आहे. यावर उपाय म्हणून महावितरणकडून एका कृषी पंपाचा वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी पाच हजार रुपयांची मागणी केली जात आहे. या प्रश्नावर उपाय म्हणून पाच हजार रुपये ऐवजी तीन हजार रुपये महावितरण ने घ्यावे व विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी लोकप्रतिनिधीं व शेतकऱ्यांनी केली आहे.
या वीज जोडणी खंडित करण्याच्या कारवाईमुळे जालना जिल्ह्यातील राजूर उपकेंद्र अंतर्गत असलेल्या तीसगावांमधील तब्बल चार हजार दोनशे कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.यावर आता महावितरण यांच्या भूमिकेकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
हा निर्णय घेण्यामागे महत्त्वाचे कारण
घरगुती तसेच औद्योगिक वीज थकबाकीच्या कित्येक पटीने थकबाकी कृषि पंप धारकांकडे आहे.विविध प्रकारच्या योजना तसेच सवलती देऊनही कृषी पंपांची वीज बिल भरले जात नसल्यामुळे शेवटचा पर्याय म्हणून हा निर्णय महावितरण ला घ्यावा लागत आहे.
अनेक वेळा सांगून देखील वीज बिल भरणा कडे दुर्लक्ष होत असल्यानेच वरिष्ठांच्या आदेशानुसार ही कारवाई होत असल्याचे सहाय्यक अभियंता यांचे म्हणणे आहे. त्यामुळे वीज बिल भरावे व महावितरण ला सहकार्य करून वीज पुरवठा सुरळीत करून घेणे हाच पर्याय आहे.(स्त्रोत-tv9 मराठी)
Share your comments