शेतकरी सध्या परतीच्या पावसामुळे अडचणीत आला आहे. यामुळे शेतकरी मदतीची मागणी करत आहेत. असे असताना एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नांदेड जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी पीक विमा कंपनीकडून शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोप केला जात आहे. यामुळे याची चर्चा सुरु आहे.
नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी आलेल्या विमा कंपनीच्या प्रतिनिधी यांनी प्रत्येकी तीन हजार रुपये देण्याची मागणी केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला असल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यामुळे याची चौकशी करण्याची मागणी केली जात आहे. मराठवाड्यातील परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
यामध्ये सोयाबीन उडीद, मूग ,कापूस या हाताला आलेली पीकं मातीमोल झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून नुकसान भरपाईची मागणी केली जात आहे. तर पीक विमा कंपन्यांकडून पंचनामे करण्याची मागणी केली जात आहे. मात्र पंचनामे करण्यासाठी आलेल्या विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतकऱ्यांकडून पैसे मागत असल्याचा आरोप होत आहे.
आता सौर उर्जेवर चालणारे एलईडी ऑटोमॅटिक दिवे बजारात, किमतीही आहे मापात..
येथील हदगाव तालुक्यातील कोथळा गावात पीकांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे पीक नुकसानीचे पंचनामे करण्यासाठी संबधित विमा कंपनीचे प्रतिनिधीनी आले होते. मात्र पिकांचे 100 टक्के नुकसान दाखवण्यासाठी तीन हजार रुपये द्यावे लागतील, अशी मागणी विमा कंपनीच्या प्रतिनिधीकडून केली गेली. यामुळे शेतकरी संतप्त झाले.
या 5 CNG कार दिवाळीत परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध, आत्ताच करा बुक
तसेच विमा प्रतिनिधी यांनी केलेल्या पैश्यांची मागणी पूर्ण न केल्याने त्यांचे पीक विम्याचे कागदपत्र कंपनीच्या प्रतिनिधींनी अक्षरशः फेकून दिली असल्याचा आरोप येथील शेतकरी केशवराव नाजुराव देवसरकर यांनी केला आहे. यामुळे आता सरकारने याकडे लक्ष देण्याची गरज आहे. अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत.
महत्वाच्या बातम्या;
ओडिशाचे सर्वात मोठे कृषी प्रदर्शन; कृषी उन्नती परिषद सुरू, कृषी जागरणतर्फे आयोजन
किसान सन्मान निधीचे २ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा..
Diwali: या राज्यांमध्ये दिवाळीत फटाके फोडण्यावर बंदी, भरावा लागणार दंड
Share your comments