नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील शेतकऱ्यांवर चार ही बाजूने संकटे आली आहेत. जे की मागील तीन दिवसांपासून अवकाळी पावसामुळे द्राक्षच्या बागांचे मोठे नुकसान झाले आहे. द्राक्षच्या बागा उध्वस्त झालेल्या आहेत तर घडांवर सुद्धा विपरीत परिणाम झाले आहेत. परंतु याचा उसावर कोणता परिणाम झाला न्हवता. मात्र जर नुकसान होणार असेलच तर ते कुठून पण होतेच आणि हेच येवला तालुक्यातील दहेगाव-पाटोदा परिसरात घडले आहे. वादळी वारे सुटले असल्यामुळे लाईट च्या तारांचे एकमेकास घर्षण झाले आणि त्याची ठिणगी उसाच्या फडात पडली असल्याने जवळपास १ एकर ऊस जळून खाक झालेला आहे. मागील अनेक दिवसांपासून परिसरात तारा लोंबकाळात आहेत.
शेतकऱ्यांचे शर्थीचे प्रयत्नही ठरले व्यर्थ :-
सध्या ऊस तोडीला आला असला तरी वेळेत ऊस तोड होत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. हंगाम उलटला तरी सुद्धा ऊसतोड होत नसल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तर दुसऱ्या बाजूला विजेच्या तारेचे ठिणगी पडल्याने सुनील माणिकराव जाधव या शेतकऱ्याच्या १ एकर क्षेत्रातील ऊस जळून खाक झालेला आहे. ठिणगी पडताच आग लागली होती त्याचवेळी शेतकऱ्याने आग विझवण्याचा प्रयत्न केला होता मात्र वादळी वारे सुटले असल्यामुळे आग पसरतच गेली आणि काही क्षणातच एक एकरातील ऊस आगीने खाक झाला.
अतिरिक्त ऊसाचा प्रश्न कायम :-
ऊसगाळपचा हंगाम अगदी शेवटच्या टप्यात आहे तरी सुद्धा नाशिक जिल्ह्यातील उसाचा प्रश्न काय सुटत नाही. ऊस लागवड करून १५ महिने होऊन गेले तरी सुद्धा अजून ऊस तोड झाली नाही त्यामुळे ऊस उत्पादनात घट होणार आहेत आणि ऱ्या अजून उसाला आग लागली असल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. ऊस हे नगदी पीक आहे जे की यावर शेतकऱ्याची अर्थव्यवस्था सुधारते मात्र सध्या तरी हे पीक नुकसानीचे ठरले आहे.
अशी मिळवा महावितरणकडून मदत:-
महावितरणाच्या घाळ कारभारामुळे शेतकऱ्याचा ऊस जळाला असेल तर ऊस मालकाला संबंधित कागदपत्रे ही अर्जासोबत महावितरणच्या विभागीय कार्यालयात जमा करावी लागणार आहेत. जशी की मागील तीन वर्षांचा सातबारा उतारा, महसूल विभागाचा आणि पोलीसांनी केलेला पंचनामा तसेच किती क्षेत्र ऊस जळाला आहे त्याचा फोटो आणि ऊस क्षेत्रातील ठिबक सिंचन व पाणीपुरवठा करणारे साहित्या जे जळाले आहे त्याचे बिल. एवढेच नाही तर मागील तीन वर्षांचे साखर कारखानामधील बीले अर्जासोबत जोडावी लागणार आहेत.
Share your comments