1. बातम्या

गेला पाऊस कुणीकडे? पावसाची दडी, पेरण्या संकटात

ललिता बर्गे
ललिता बर्गे
पावसाची दडी, पेरण्या संकटात

पावसाची दडी, पेरण्या संकटात

मुंबई- राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने खरीप पिके (kharif crop) संकटात सापडली आहेत. मॉन्सूनपूर्व पावसाने (rain) हजेरी लावल्यानंतर राज्यातील बहुतांश जिल्ह्यात पावसाने दडी दिली आहे. हवामान खात्याने दमदार पावसाचा अंदाज वर्तविल्यानंतर आशा दुणावलेल्या शेतकऱ्याच्या शिवारावर निराशेचे ढग दाटले आहेत.

यंदा राज्यात सोयाबीनचा (soyabin) पेरा सर्वाधिक आहे. त्यामुळे लांबलेल्या पावसाचा फटका सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना देखील बसला आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगाम धोक्यात येण्याची चिंता शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. जुलै नंतर ऑगस्ट महिना सुरू झाल्यानंतरही पावसाने अद्याप दमदार हजेरी लावलेली नाही.

आभाळ भरुन येते. पाऊस पडणार असे संकेतही मिळतात. मात्र, प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पाहायला मिळते. खरीपाच्या पेरण्या काही भागात खोळबंळलेल्या आहेत. तसेच काही ठिकाणी दुबार पेरणींचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे ठाकले आहे. पावसाने दिलेली उघडीप आणि कोरोनामुळे मंदावलेलं आर्थिक चक्र यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.

शेतकऱ्यांनी पिकातील आंतरमशागतीची कामेही पूर्ण केली आहेत. आता सर्व पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. पण नेमक्या पीकवाढीच्या अवस्थेतच पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकऱ्यांतून चिंता व्यक्त होत आहे. सोयाबीन, तूर, मूग, उडीद ही पिके सध्या चांगलीच बहरली आहेत.

 

सोयाबीनला ठिबकचा आधार (water irrigation)

यंदा अधिक भाव मिळण्याच्या आशेने मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी सोयाबीनची लागवड केली. जमिनीत असलेल्या ओलाव्याच्या आशेवर शेतकऱ्यांची भिस्त होती. मात्र, शेतात असलेलं पिक टिकविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. ठिबक सिंचनाद्वारे असलेले पीक वाचविण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. सोयाबीनला ठिबकचा आधार असे म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.

गेल्या पंधरवड्यापासून पुन्हा एकदा पावसाने विश्रांती घेतल्याने या पिकांवर संकट ओढावले आहे. प्रामुख्याने सोयाबीन, तूर, मूग, उडीद या पिकांना सध्या पावसाची गरज आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर जून व जुलैत पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे खरीप पिकांच्या क्षेत्रात मोठी वाढ झाली. कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार, बहुतांश जिल्ह्यांनी पेरणीचे उद्दिष्ट गाठले होते.

 

वेधशाळेवर भरवसा नाही का?

वेधशाळेकडून हवामानाचे वर्तविले जाणारे अंदाज सातत्याने चुकत आहेत. मुसळधार किंवा विक्रमी पावसाचा अंदाज वर्तविला होता. मात्र, ऐन श्रावणात उन्हाच्या झळ्या सहन कराव्या लागत आहेत. वेधशाळेच्या अंदाजानुसार शेतकरी पिकांचे नियोजन आखतात. मात्र यंदा वेधशाळेच्या अंदाजावर भरोसा ठेवल्यामुळे त्यांचे नियोजन कोलमडण्याची स्थिती निर्माण झाली आहे.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters