1. बातम्या

जगातील सर्वाधिक सोयाबीन उत्पादक देशात घटणार सोयाबीनचे उत्पादन, ही आहेत उत्पादनघटी मागील कारणे

जगातील सोयाबीन उत्पादक देशांमध्ये ब्राझील हा देश जगातील सर्वाधिक सोयाबीन उत्पादन करतो. परंतु यावर्षी ब्राझीलमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात घट येण्याची शक्यनता आहे. कारण ब्राझीलमध्ये नैसर्गिक परिस्थितीने या उत्पादनात घट येऊ शकते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
soyabioen

soyabioen

जगातील सोयाबीन उत्पादक देशांमध्ये ब्राझील हा देश जगातील सर्वाधिक सोयाबीन उत्पादन करतो. परंतु यावर्षी ब्राझीलमध्ये सोयाबीनच्या उत्पादनात घट येण्याची शक्‍यता आहे. कारण ब्राझीलमध्ये नैसर्गिक परिस्थितीने या उत्पादनात घट येऊ शकते.

कारण ब्राझील मधील उत्तर भागात जास्तीचा पाऊस झाल्याने तसेच बऱ्याच ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. तर ब्राझीलच्या दक्षिण भागांमध्ये तीव्र दुष्काळाची परिस्थिती आहे त्यामुळे तेथील उत्पादनाच्या अंदाजात 116 लाख टनांची घट होईल असे ब्राझील मधील ॲग्रीरूरल या संस्थेने म्हटले आहे.

 ब्राझीलमधील रिओ ग्रँन्डोडो सूल या राज्यामध्ये पाऊस आणि उष्ण तापमान असल्यामुळे आत्ताच येथील उत्पादन अंदाजात घट करण्यात आली नाही, असे ॲग्री रूरल या संस्थेने म्हटले आहे.

माटोग्रासो डोसूल राज्यातील दक्षिण भागात पाऊस कमी होऊन दुष्काळी स्थिती आहे.त्यामुळे तेथील उत्पादनाच्या अंदाजात कपात करण्यात आली आहे. तसेच दक्षिणेतील इतर राज्यात देखील उत्पादन घटण्याचा अंदाज आहे. ब्राझीलच्या दक्षिण भागांमध्ये दुष्काळी परिस्थिती असली तरी त्यामधील इतर भागात पिकांची स्थिती चांगली आहे. त्यामुळे तेथे उत्पादनात पाहिजे तेवढी घट येईल असे वाटत नाही. 

ब्राझील मधील माटो ग्रोसो राज्यामध्ये सोयाबीन पिकाची स्थिती चांगली आहे तेथील सोयाबीन काढणी सुरू झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी सोयाबीन चे उत्पादन 1440 लाख टनांवर पोचले असा अंदाज होता मात्र एकूणच दुष्काळी स्थिती आणि उद्भवलेल्या परिस्थितीमुळे हे उत्पादन 1334 लाख टनांवर स्थिरावेल असे म्हटले आहे. मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी सोयाबीनचे उत्पादन कमी राहील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.(संदर्भ-ॲग्रोवन)

English Summary: decrese soyabioen production in brazil due to havy rain and flood Published on: 09 January 2022, 06:21 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters