जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात केळीचे पीक घेतले जाते. तीन हंगामात केळीची लागवड करण्यात येते. परंतु यावर्षी झालेल्या पावसाने केळी बागांचे अतोनात नुकसान केले होते. त्यातच शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडली होती ते केळीच्या भावात झालेल्या घसरणीमुळे.
मागच्या काही दिवसांअगोदर तीन ते चार रुपये किलोने खरेदीदार केळीला घेत नव्हते. त्यामुळे बऱ्याच केळी उत्पादक शेतकऱ्यांनी केळीचे बाग तोडण्यावर भर दिला. परंतु आता या परिस्थितीत थोडासा बदल होताना दिसत आहे.केळीचे आगार असलेल्या खानदेश मध्ये केळीची आवक घटत असल्याने भावात सुधारणा होताना पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत केळीचे दरसात ते आठ रुपये किलोवर गेले आहेत. त्यामुळे आता जे बाग काढणीला आले आहेत आणि सुरु असलेल्या शेतकऱ्यांना या वाढीव दराचा फायदा मिळणार आहे.
निर्यातीचा मिळू शकतो आधार
चांगल्या दर्जाच्या केळीला 800 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत असून गेल्या काही महिन्यात ला हा सर्वात चांगला भाव असल्याचे व्यापारी सांगत आहेत. आवक घटल्याने दरात सुधारणा होत असून त्यासोबतच येणाऱ्या फेब्रुवारी महिन्यापासून केळीचे निर्यातही सुरू होणार आहे त्यामुळे येणारा काळकेळीच्या भावासाठी चांगला राहणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच निर्यातीच्या माध्यमातून अधिकचा दर केळीला मिळत असल्याने अडचणीत असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे.
तसेच केळीच्या भावावर वाढत्या तापमानाचा देखील परिणाम जाणवूशकतो. थंडीच्या वाढत्या प्रभावामुळे केळी बागांचे मोठे नुकसान तर झालेच पण थंडीमुळे केळीच्या दरावरी परिणाम होतो. थंडीमध्ये मागणीच नसते. आता थंडी कमी होऊन तापमानात वाढ होत आहे त्याचा फायदा हा केळी उत्पादकांना होणार आहे.
Share your comments