1. बातम्या

जळगाव जिल्ह्यात पावसाच्या अभावामुळे कडधान्य उत्पादनात घट

किरण भेकणे
किरण भेकणे
डाळी

डाळी

यावर्षी जळगाव जिल्ह्यामध्ये पावसाने आपली हजेरी महिनाभर उशिरानेच लावली होती त्यामुळे जळगाव मधील शेतकऱ्यांच्या यावर्षी पेरण्या सुद्धा उशिराच सुरू झाल्या. जरी उशिरा पाऊस(rain) दाखल झाला पण अजून असा दमदार पाऊस पडला नसल्याने जळगाव जिल्ह्यातील क्षेत्रात अजूनही  १०० टक्के  पेरण्या  झालेल्या नाहीत. जिल्ह्यामध्ये आजच्या स्थितिला पाहायला गेले तर फक्त ९० टक्के पेरण्या झालेल्या आहेत त्यामध्ये ३५ ते ४०  टक्के कडधान्य वर्गीय पिकांचीच लागवड झालेली आहे.

५० टक्यांपेक्षा जास्त घट:

जिल्ह्यामध्ये पावसाने (rainfall) उशिराच सुरू केला आणि त्यात पावसाचा एवढा मोठा खंड पडल्यामुळे उडीद, मुग व तूर  अशा  प्रकारच्या कडधान्य  वर्गीय  पिकांच्या लागवडीवर परिणाम झाला. जर आत्ता चांगल्या प्रकारे अगदी दमदार पाऊस नाही पडला तर कडधान्य पिकांच्या उत्पादनामध्ये ५० टक्यांपेक्षा जास्त घट होईल असे शेतकऱ्यांनी आपला अंदाज लावलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील अनेक तालुक्यामध्ये कापूस या पिकासोबत उडीद, मुग तसेच तूर या कडधान्य  वर्गीय पिकांची मोठ्या प्रमाणात शेतकरी आपल्या शेतामध्ये लागवड करतात.

हेही वाचा:आंतरराष्ट्रीय पोटाश संस्था पॉलीहालाइट खतांच्या सहाय्याने भाजीपाला उत्पादन आणि त्याची गुणवत्ता वाढवण्यासाठी वेबिनार आयोजित करते

जळगाव जिल्ह्यात दरवर्षी या पिकांचे क्षेत्र जवळपास ८० ते ८५ हजार एकर असते. जे की यावर्षी ९० टक्के या कडधान्य वर्गीय पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत पंरतु पावसाने मधेच दांडी मारल्यामुळे तसेच पावसाचा खंड पडल्यामुळे तेथील शेतकरी संकटात असल्याचे दिसून येत आहे व त्यानी ५० टक्के पेक्ष्या जास्त घट होईल असे सुद्धा सांगितले आहे.दरवर्षी ८० ते ८५ हजार एकर वर या पिकांच्या पेरण्या  होतात  मात्र यावर्षी फक्त ५० ते ५२  हजार एकर क्षेत्रावर  कडधान्य पिकांच्या पेरण्या झालेल्या आहेत. यावर्षी पावसाने उशीर सुद्धा केला आणि खंड सुद्धा पडला त्यामुळे कमी क्षेत्रात लागवड झालेली दिसून येत आहे.

पावसाने जिल्ह्यामध्ये आपले उशिरा आगमन केल्यामुळे कडधान्य पिकांच्या लागवडीवर परिणाम झाला जे की  पावसामुळे या  पिकांची लागवड जवळपास दीड ते दिन महिने उशिरा झाली आणि यामुळेच यावर्षी कडधान्य वर्गीय पिकांचे उत्पादन ५० टक्के पेक्षा जास्त घट  होईल  असे सांगण्यात  आलेले  आहे. जळगाव जिल्ह्यात यावर्षी उडीद या कडधान्य पिकाची लागवड २० हजार ३०६ एकर वर झाली आहे तसेच मुग या कडधान्य  वर्गीय पिकाची  लागवड  २१ हजार  ८६७ एकर क्षेत्रावर झालेली आहे मात्र तूर पिकाची लागवड फक्त ११ हजार एकर वर झाली आहे.

Like this article?

Hey! I am किरण भेकणे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters