यंदा सोयाबीन आणि सुर्यफूल या दोन्ही पीकांमध्ये घट होणार असल्याचा अंदाज केंद्रीय कृषी मंत्रालयाच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे साहजिकच तेलबियांचे उत्पादन 233.90 लाख टन होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खरिपात यंदा 260 लाख टन उत्पादन होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. खरिपातील पीकाचे पावसाने आणि रोगराईने नुकसान झाल्याने ही परस्थिती ओढावलेली आहे. मागील वर्षी तेलबियाणांचे उत्पादन हे 240. 30 लाख टन झाले होते.
खरिपातील पिकावर तेलबियाणांचे उत्पादन हे अवलंबून आहे. त्याच अनुशंगाने कृषी मंत्रालयाकडून दरवर्षी तेलबियांचे अंदाजित उत्पादन काढले जाते. खरीपातील पेरणी होताच हा अंदाज बांधला जातो. त्यानुसार यंदाही 260 लाख टन उत्पादन होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. सोयाबीन, भुईमूग, सुर्यफूल आणि तीळाच्या उत्पादनावर हे गणित मांडले जाते.
तेलबियाणांच्या दष्टीने सुर्यफुल हे महत्वाचे पीक आहे. गेल्या तीन वर्षापासून तेलबियांच्या उत्पादनात वाढच होत आहे. गतवर्षी 222. 47 लाख टनाचे उत्पादन झाले होते तर 2018-19 मध्य़े 206.76 लाख टनाचे उत्पादल देशात झाले होते. देशात यंदा सोयाबीनमधून 127.20 लाख टन उत्पादन होण्याची शक्यता होती तर सोयाबीनचे गेल्या वर्षी 128.97 लाख टन उत्पादन झाले होते.
शेतकरी हिताच्या दृष्टीने मोदी सरकार हे काम करीत असल्याचे केंद्रीय मंत्री नेरेंद्रसिंह तोमर यांनी सांगितले आहे. खरीपाचे उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने विविध योजना स्थानिक पातळीवर राबवण्याची गरज आहे. शिवाय कमी पाणी, रासायनिक खतांचा कमी वापर यातून उत्पादन वाढविण्याचा सकरकारचा प्रयत्न राहणार आहे.
रब्बीत शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी नवीन वाण
देशातील अन्नधान्य उत्पादनाचे लक्ष्य साध्य केले जात आहे, असे कृषी सचिव संजय अग्रवाल यांनी सांगितले. शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी केंद्र सरकारने रब्बी हंगामासाठी किमान आधारभूत किंमतही जाहीर केली आहे. खत सचिव राजेशकुमार चतुर्वेदी यांनीही या परिषदेला संबोधित केले.
भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. त्रिलोचन महापात्रा म्हणाले की, परिषद शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करत आहे, नवीन पिकांच्या वाणांचा शेतकऱ्यांना फायदा होईल. कृषी उत्पादन आयुक्त डॉ. एस.के. मल्होत्रा यांनी खरीपातील पिकांची सद्यस्थिती आणि आगामी रब्बी हंगामाची परिस्थिती सादरीकरणाद्वारे स्पष्ट केली.
Share your comments