हिच परीस्थीती देऊळगाव धनगर,मेरा खु,भरोसा भागामध्ये होऊन परीसरातील शेतकर्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने अतिवृष्टिमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन,उडीद यासह इतर पिकाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे आदेश कृषी विभाग व विमा कंपन्यांना देऊन तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करण्याची मागणी दि०१/१०/२०२१
रोजी देऊळगाव धनगर येथील शेतकरी यांनी शेनफडराव घुबे, विनायक सरनाईक, यांच्या नेतृत्वात तहसिलदार यांची भेट घेत सविस्तर चर्चा करीत निवेदनाव्दारे केली आहे.
सविस्तर वृत्त असे की,दि२३/०९/२०२१पासुन देऊळगाव धनगर परीसरात दररोज ढगफुटी सारखा मुसळधार पाऊस कोसळत असुन उडीद व सोयाबीनचे पिक काढणीला आले असतांना उडीद पिक सोंगुन टाकली असतांना सततच्या पावसामुळे पिकास कोंब फुटून उभे पिक सडुन गेली आहेत.त्याचप्रमाणे सततधार सुरु असलेल्या पावसाचे व नद्यांचे पाणी शेतात तुंबून सोयाबीन पिके कोलमडुन पडुन उभ्या पिकाला कोंब फुटले आहेत.सोयबीन,उडीद व इतर पिक हातुन गेल्यामुळे शेतकर्याच्या तोंडी आलेला घास निघून गेल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.असे असतांना कृषी विभाग अर्ज स्वीकारण्यास तयार नाही तर विमा कंपण्यांच्या अधिकार्यानी फोन बंद करुन ठेवले आहे.त्यामुळे शेतकर्यानी तक्रार करायची कुणाकडे असा सवाल निवेदनामध्ये उपस्थीत करण्यात आला असुन ७२तासाच्या आत विमा कंपन्यांकडे अर्ज करण्याची विमा कंपन्यांनी मुदत जाहिर केली असली तरी आॅनलाइन तक्रार करण्यासाठी नेट व्यवस्थीत चालत नाही.आॅनलाईन तक्रार दाखल होत नाही.
त्यामुळे शेतकरी सोयाबीन सोंगणीचे कामे सोडुन आॅफलाइन अर्जाच्या भानगडीत पुरता भरडुन गेला आहे.हवालदिल झाले आहे.हि शेतकर्याची एक प्रकारे चालवलेली चेष्ठा असुन शेतकरी यांना आर्थीक भुरदंड कसा पडेल याचेच नियोजन पिक विमा कंपनी करतेय काय?असा सवाल शेतकरी उपस्थीत करीत असुन असे असतांना व नुकसान झाले असुनही प्रशासनाचा एक अधिकारी अद्यापर्यत शेती बांधावर आला नसल्याने अतिवृष्टिमुळे झालेल्या पिकाची महसुल विभाग व कृषी विभाग यांच्या समन्वयाने नुकसानीचे प्रत्यक्ष पाहणी करुण नोंद घेणे बाबत व विमा कंपन्यांना सुद्धा ७२तासानंतर अर्ज स्विकारणे बाबतचे आदेश व्हावेत तसेच संपुर्ण चिखली तालुक्यात नुकसानीची हिच परीस्थीती असल्याने तालुक्यात ओला दुष्काळ जाहिर करुण शेतकर्याना नुकसान भरपाई अदा करुण दिलासा देण्याची मागणी देऊळगाव धनगर येथील शेतकरी यांनी चिखली तहसिलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली
असुन या अडचणींच्या अनुषंघाने सविस्तर चर्चा देखील करण्यात आली आहे.यावेळी शेनफडराव घुबे, स्वाभिमानी चे विनायक सरनाईक,अमोल मोरे,प्रकाश घुबे,भानुदास पुंजाजी घुबे,दिनकर घुबे,गजानन घुबे,संतोष सरोदे,गणेश डवले,निवृत्ती घुबे,गजानन पांडुरंग घुबे यांच्यासह शेतकरी उपस्थीत होते.
प्रतिनिधी - गोपाल उगले
Share your comments