सरकारच्या योजना जर ज्यांना खरी गरज आहे, अशा शेतकऱ्यापर्यंत पोहोचल्या तर खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांना बळकटी मिळते. असे अनेकदा घडत नाही. आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाची योजना असलेली प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेबाबत एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
आता प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेचा कालावधी वाढवण्यात आला आहे. यामुळे उर्वरीत शेतकऱ्यांना फायदा तर होणारच आहे पण शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होणार आहे. केंद्र सरकारने डिसेंबर 2021 मध्ये प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेला 2026 पर्यंत पाच वर्षे मुदतवाढ देण्यास मंजुरी दिली होती. यामुळे याचा लाभ आता यापुढेही घेता येणार आहे.
या योजनेत कोरडवाहू शेत जमिनीला या योजनेच्या माध्यमातून पाणी मिळावे हा उद्देश आहे. 2015 मध्ये ही कृषी सिंचन योजना सुरु झाली होती. त्यावेळी केवळ 6 हजार 500 कोटी हेक्टर शेतजमिन ही सिंचनाखाली होती. सिंचनाचे क्षेत्र वाढवण्यासाठी ही योजना महत्वाची ठरत आहे. शिवाय या योजनेतील अनुदानही वाढवण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांचा फायदा बघून ही मुदत वाढवण्यात आली आहे.
पाण्याची बचत हा देखील या योजनेचा महत्वाचा घटक आहे. 2020-21 या वर्षात या योजनेअंतर्गत 9 लाख 38 हजार हेक्टरवरील पिके सूक्ष्म सिंचनाखाली आली आहेत. या योजनेचा एकूण खर्च हा 93 हजार 68 कोटी एवढा आहे. योजनेचा फायदा हा अनेक शेतकऱ्यांना होत आहे. यामुळे येणाऱ्या काळात देखील अनेक अनेक शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
तब्बल 736 दिवसांनी सर्वच नागरिकांची मास्कपासून मुक्ती, ठाकरे सरकारची मोठी घोषणा
पशुपालकांनो!! जाणून घ्या दुग्धव्यवसायात धेनू अँप्लिकेशनचे महत्व...
काळजावर दगड ठेवून शेतकऱ्याने केले 'ते' कृत्य, कारखान्याने काही वेळातच टाकली उसाला तोड..
Share your comments