जगाचा पोशिंदा समजल्या जाणाऱ्या बळीराजा नेहमीच दुर्लक्षित राहिला आहे. त्यामुळे त्याला त्याच्या न्याय हक्कासाठी कायम लढा द्यावा लागतो. अशाच विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलेल्या शेतकऱ्यांवरील गुन्हे लवकरच मागे घेतले जाणार असल्याचे राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, या शिवाय बैलगाडा शर्यत आयोजकांवर देखील झालेले गुन्हे मागे घेण्यात येणार आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
याबाबत तातडीने कार्यवाही करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्याचेही ते म्हणाले. श्री क्षेञ थापलिंग देवस्थान यात्रेप्रसंगी उपस्थित शेतकरी, बैलगाडा मालक यांना संबोधित करताना वळसे पाटील बोलत होते. या प्रसंगी शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे, ट्रस्टचे अध्यक्ष देवदत्त निकम, पुणे जिल्हा दुध संघाचे माजी अध्यक्ष विष्णुकाका हिंगे, भीमाशंकर कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे जिल्हा परीषेदचे माजी उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, सरपंच सुजाता रिठे, उपसरपंच सुनिल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोरोना परिस्थितीमुळे महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांची केलेली कर्जमाफीमध्ये वेळेवर पैसे भरलेल्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांची सवलत देण्याचा घेतलेला निर्णयाचे पैसे देणे शक्य झाले नाही. परंतु नुकत्याच झालेल्या बजेटमध्ये कर्जमाफीच्या रकमेची तरतुद करण्यात आली असुन लवकरच ५० हजार रुपये त्यांच्या खात्याप्रमाणे मिळणार असल्याचे वळसे पाटील म्हणाले.
यामुळे आता शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत अनेक दिवसांपासून मागणी केली जात होती. अखेर आता यावर निर्णय घेण्यात आला आहे. काही वर्षांपासून बैलगाडा शर्यत आयोजकांवर मोठ्या प्रमाणावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. काही वर्षात यावर बंदी होती. आता मात्र बैलगाडा शर्यतींवरील बंदी उठवण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या;
आख्ख मार्केट आता आपलंय!! बीडच्या शेतकऱ्यानं मार्केटच ताब्यात घेतल, लाखोंचा फायदा..
मोठी बातमी! चीनमध्ये कोरोना संसर्गामुळे हाहाकार, पुन्हा लॉकडाऊन लागू
शेतकऱ्यांनो पंजाब डख यांनी केलेला पावसाविषयी अंदाज वाचा, शेतीच्या कामाबाबत आहे फायद्याचे..
Share your comments