1. बातम्या

Shivsean : शिवसेनेच्या १६ अपात्र आमदारांचा निर्णय लांबणीवर?; विधानसभा अध्यक्षांनी काय दिली नोटीस?

शिवसेना शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र करा अशी याचिका ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. याचिकेपासून हे प्रकरण रखडले असल्याने उत्तर देण्यात यावे यासाठी राहूल नार्वेकर यांनी ४० आमदारांना नोटीस देऊन उत्तर मागितले होते.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
Shivsena Update

Shivsena Update

मुंबई

शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रेचा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. अपात्र आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर ते प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे आले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांना नोटीस देऊन १४ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले होते. मात्र शिवसेनेच्या ४० आमदारांनी याबाबत मुदतवाढ मागितल्याने हे प्रकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.

शिवसेना शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र करा अशी याचिका ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. याचिकेपासून हे प्रकरण रखडले असल्याने उत्तर देण्यात यावे यासाठी राहूल नार्वेकर यांनी ४० आमदारांना नोटीस देऊन उत्तर मागितले होते. परुंतु दोन्ही बाजूकडून उत्तर न आल्याने पुन्हा हे प्रकरण लांबण्याची शक्यता आहे.

राहूल नार्वेकर घेणार अपात्रेबाबत निर्णय

ठाकरे गटाने १६ आमदारांना अपात्र करा अशी याचिका केली. याबाबत सुप्रीम कोर्टात देखील सुनावणी झाली. यावेळी निर्णय देण्याचे काम न्यायायलाने विधासभा अध्यक्षांकडे दिले. त्यानुसार नार्वेकरांनी नोटीस दिली होती. पण त्या नोटीसला उत्तर देण्यासाठी आमदारांनी मुदतवाढ मागितली आहे.

अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांची नावे

एकनाथ शिंदे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, चिमणराव पाटील, भरत गोगावले, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, यामिनी जाधव, लता सोनवणे, रमेश बोरणारे, बालाजी कल्याणकर, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमूलकर

English Summary: Decision of 16 ineligible Shiv Sena MLAs delayed What was the notice given by the Speaker of the Legislative Assembly Published on: 25 July 2023, 12:26 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters