मुंबई
शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रेचा निर्णय लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. अपात्र आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर ते प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहूल नार्वेकर यांच्याकडे आले आहे. त्यामुळे विधानसभा अध्यक्षांनी शिवसेनेच्या दोन्ही गटातील आमदारांना नोटीस देऊन १४ दिवसांत उत्तर देण्यास सांगितले होते. मात्र शिवसेनेच्या ४० आमदारांनी याबाबत मुदतवाढ मागितल्याने हे प्रकरण लांबणीवर जाण्याची शक्यता आहे.
शिवसेना शिंदे गटातील १६ आमदारांना अपात्र करा अशी याचिका ठाकरे गटाने विधानसभा अध्यक्षांकडे केली आहे. याचिकेपासून हे प्रकरण रखडले असल्याने उत्तर देण्यात यावे यासाठी राहूल नार्वेकर यांनी ४० आमदारांना नोटीस देऊन उत्तर मागितले होते. परुंतु दोन्ही बाजूकडून उत्तर न आल्याने पुन्हा हे प्रकरण लांबण्याची शक्यता आहे.
राहूल नार्वेकर घेणार अपात्रेबाबत निर्णय
ठाकरे गटाने १६ आमदारांना अपात्र करा अशी याचिका केली. याबाबत सुप्रीम कोर्टात देखील सुनावणी झाली. यावेळी निर्णय देण्याचे काम न्यायायलाने विधासभा अध्यक्षांकडे दिले. त्यानुसार नार्वेकरांनी नोटीस दिली होती. पण त्या नोटीसला उत्तर देण्यासाठी आमदारांनी मुदतवाढ मागितली आहे.
अपात्रतेची टांगती तलवार असणाऱ्या आमदारांची नावे
एकनाथ शिंदे, संजय शिरसाट, तानाजी सावंत, चिमणराव पाटील, भरत गोगावले, अब्दुल सत्तार, संदीपान भुमरे, यामिनी जाधव, लता सोनवणे, रमेश बोरणारे, बालाजी कल्याणकर, प्रकाश सुर्वे, बालाजी किणीकर, अनिल बाबर, महेश शिंदे, संजय रायमूलकर
Share your comments