
decision ban sugar export foolish
मोदी सरकारने साखर निर्यात बंदीचा निर्णय नुकताच जाहीर केला. यामुळे आता यावर अनेकांच्या प्रतिक्रिया येत आहेत. असे असताना आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, जर असा निर्णय झाला तर तो ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व साखर उद्योगाला खड्डयात घालणारा असेल.
राजू शेट्टी म्हणाले, केंद्र सरकारने रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या पार्श्वभूमीवर गव्हाच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्याचा फटका गहू उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. यामुळे त्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच कांदा १ रूपया प्रति किलो दराने शेतकऱ्यांकडून खरेदी केला जात आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही.
यामुळे साखर निर्यात बंदीचा निर्णय देखील शेतकऱ्यांना तोटा सहन करणारा असेल असेही ते म्हणाले. राज्यात अजून अनेक शेतकऱ्यांचा ऊस गळपाविना तसाच आहे. मात्र याकडे लक्ष देण्यासाठी सरकारला वेळ नाही. यामुळे शेतकरी आत्महत्या करत आहेत. तसेच पुढील वर्षीच्या निर्यातीचे आतंरराष्ट्रीय बाजारातील करार न झाल्यास साखर उद्योगावर गंभीर परिणाम होतील.
अजून किती शेतकऱ्यांच्या आत्महत्याची वाट बघणार, अतिरिक्त उसाबाबत वासुदेव काळे आक्रमक
यामुळे केंद्र सरकारचा हा निर्णय अतिशय मुर्खपणाचा असून देशातील साखर उद्योगाला खड्ड्यात घालणारा आहे. दिल्लीत अति शहाण्या लोकांना याचा विचार करून निर्णय घ्यावा. केंद्राने शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेऊन तातडीने साखर निर्यातीचे धोरण राबवावे, असेही राजू शेट्टी यांनी सांगितले.
रेशन घेण्याच्या प्रक्रियेत मोठा बदल, सर्वसामान्य लोकांना मोठा धक्का
यामुळे देशातील शेतकरी व साखर उद्योग खड्ड्यात गेल्याशिवाय राहणार नाही. यामुळे याकडे गांभीर्याने विचार करणे गरजेचे आहे. दरम्यान ऊस उत्पादक शेतकरी अतिरिक्त उसामुळे अडचणीत आला आहे. अनेकांचे ऊस मे महिना संपत आला तरी अजूनही तोडले गेले नाहीत.
महत्त्वाच्या बातम्या;
शेतकऱ्यांना खतासाठी जास्त पैसे मोजावे लागणार नाहीत, मोदी सरकारने केली शेतकऱ्यांच्या हिताची घोषणा
पेट्रोलनंतर आता खाद्यतेलाचे दरही होणार कमी, मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय
यावर्षीच्या अतिरिक्त उसामुळे पुढील वर्षीच्या गाळपाबाबत अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय
Share your comments