सध्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या (Malegaon Sahakari Sakhar Karkhana) बाबतीत एक मोठी बातमी समोर आली आहे. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काहीच दिवसांपूर्वी कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 10 गावे नव्यानं जोडण्याचा निर्णय माळेगावच्या संचालक मंडळानं आवाजी मतदानाने मंजूर केला होता.
आता मात्र या निर्णयाला प्रादेशिक सह संचालकांनी स्थगिती दिली आहे. रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांनी 10 गावे नव्यानं जोडण्याच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी साखर आयुक्तालायकडे केली होती. यामुळे संचालक मंडळाला साखर आयुक्तालयानं चपराक दिली आहे. या निर्णयामुळे मोठा गोंधळ झाला होता.
या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले असताना या सभेत मोठा राडा झाला होता, कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत 10 गावे नव्याने जोडण्याचा निर्णय संचालक मंडळानं घेतला होता. हा निर्णय घेताना सभासदांनी कडाडून विरोध केला होता. तरी देखील हा निर्णय संचालक मंडळाने आवाजी मतदानाने मंजूर केला होता. यामुळे विरोधक आक्रमक झाले होते.
'बदलत्या वातावरण आणि तंत्रज्ञानाशी तरुणांना जोडण्यासाठी लघु उद्योग भारती कार्यरत'
यामुळे रंजन तावरे आणि चंद्रराव तावरे यांनी या निर्णयाला विरोध करत साखर आयुक्तालयाकडं तक्रार दाखल केली होती. अखेर 10 गावे नव्याने जोडण्याचा निर्णयाला स्थगिती दिली आहे. यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापणार आहे. या सभेत विषय मंजूर-मंजूर अशा घोषणा देत संचालकांनी सभेतून काढता पाय घेतला होता.
यामुळे अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती, मोठ्या संख्येनं सभासद हे नाही-नाहीच्या घोषणा देत होते. या गोंधळातच विषय मंजूर करुन सभा गुंडाळण्यात आली. गोंधळाच्या वातावरणातच माईकची मोडतोड करुन सभासदांनी गोंधळ घातल्याचे पाहायला मिळालं होत. अखेर आता हा निर्णय मार्गी लागला आहे.
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा ऊसदर जाहीर
दरम्यान, सोमेश्वर सहकारी साखर कारखाना क्षेत्रातील 10 गावे ही माळेगाव सहकारी साखर कारखान्याला जोडण्याचा विषय होता. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. जेव्हा 8 नंबरचा विषय चर्चेला आला तेव्हा सुरुवातीपासूनच या विषयाला अनेक सभासदांचा विरोध होता. यामुळे या सभेत मोठा गोंधळ बघायला मिळाला होता.
महत्वाच्या बातम्या;
भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याचा ऊसदर जाहीर
'बदलत्या वातावरण आणि तंत्रज्ञानाशी तरुणांना जोडण्यासाठी लघु उद्योग भारती कार्यरत'
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ३ कोटी १८ लाखांचे अनुदान वितरीत
Share your comments