
महाराष्ट्र शासनाच्या विविध प्रकारच्या कृषी योजना आहेत, त्या सगळ्या योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर हजर करण्याचे आव्हान महाराष्ट्राचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी केले आहे. या पोर्टल अर्ज करण्याची 31 डिसेंबर शेवटची तारीख आहे. या तारखेपर्यंत तेवढे अर्ज प्राप्त होतील त्या सर्व प्राप्त अर्जांची लॉटरीसाठी ग्राह्य धरले जातील, असे त्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना सोयीचे व्हावे म्हणून महाडीबीटी पोर्टल वर शेतकरी योजना या सदराखाली सर्व योजनांचा लाभ एकाच अर्जाद्वारे दिला जाणार आहे. त्यात अर्ज करण्यापासून ते प्रत्यक्षात लाभ मिळेपर्यंत एकात्मिक संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या आवडीच्या बाबींच्या स्वातंत्र्य देण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यांनी शेतीशी निगडित विविध बाबींकरिता या पोर्टलवर अर्ज करायचा आहे.
अर्ज करण्यासाठीचे विविध पर्याय
या सगळे योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला मोबाईल क्रमांक आधार कार्ड जोडणे अनिवार्य आहे. महाडीबीटी पोर्टल च्या संकेतस्थळाला भेट दिल्यानंतर शेतकरी योजना हा पर्याय निवडावा. शेतकरी मोबाईल, संगणक, लॅपटॉप, सामुदायिक सेवा केन्द्र अशा अनेक माध्यमातून या संकेतस्थळावर अर्ज करू शकतात.
हेही वाचा :फॅक्ट चेक- तीन महिने धान्य खरेदी केली नाही तर रेशन कार्ड होणार रद्द?
जर तुमच्याकडे आधार क्रमांक नसेल तर
वैयक्तिक लाभार्थी म्हणून नोंदणी करू इच्छिणाऱ्यांनी त्यांचा आधार क्रमांक या संकेतस्थळावर प्रमाणित करून घ्यावा. जर एखाद्या वापरकर्ता कडे आधार क्रमांक नसेल त्यांनी प्रथम आधार नोंदणी केंद्र कडे जाऊन त्यांची नोंदणी करावी. त्यानंतर नोंदणी क्रमांक महाडीबीटी पोर्टल मध्ये नमूद करून त्यांना योजना साठी अर्ज करता येऊ शकतो. अशा अर्जदारांना अनुदान वितरित करण्यापूर्वी महाडीबीटी पोर्टल मध्ये त्यांना देण्यात येणारा आधार क्रमांक नोंदणीकृत करून प्रमाणित करून घ्यावा लागतो, त्याशिवाय त्यांना अनुदानाचे वितरण करण्यात येत नाही किंवा येणार नाही. पोर्टल वर प्राप्त अर्थांच्या ऑनलाईन लॉटरी, पूर्वसंमती देणे तसेच निवड झालेल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वितरण करणे अशा सर्व प्रक्रिया ऑनलाइन होणार आहेत. महाडीबीटी पोर्टल वर माहिती भरण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. जर काही अर्जदारांनी अशी माहिती अगोदर भरली असल्यास नवीन अर्ज भरण्याची आवश्यकता नसते. मात्र लाभांच्या घटकांमध्ये शेतकरी हवा तसा बदल करू शकतात. ज्या लाभार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टल वर अर्ज केला नसेल, त्यांनी दिनांक 31 डिसेंबरपर्यंत आपले अर्ज पोर्टलवर करावेत असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
Share your comments