आगामी काही दिवसात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांसाठी जोरदार प्रचार सुरु आहे. राजकीय पक्षाकडून अनेक आश्वासने दिली जात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस पक्षाने आश्वासन दिली आहेत.
उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आल्यास शेतकऱ्यांचे कर्जमाफ केले जाणार आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या गहू आणि तांदळाला २५०० रुपये प्रति क्विंटल आधारभूत किंमत देण्याचे आश्वासन काँग्रेस पक्षाने दिले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने शेतीबाबतची श्वेतपत्रिका प्रसिद्ध केली आहे.
हे ही वाचा... अर्थसंकल्पात मोदी सरकार शेतकऱ्यांसाठी करणार मोठी घोषणा
डिसेंबर पासून केंद्रीय हिवाळी अधिवेशन होणार आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यामध्ये पार अडणार आहे. १ फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन सादर करणार आहेत. या अर्धसंकल्पात शेतकऱ्यांना काय मिळणार या कडे सगळ्या नजरा लागल्या आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आगामी केंद्रीय अर्थसंकल्प 2022-23 मध्ये कृषी क्षेत्रासाठी प्रोत्साहन जाहीर करतील अशी अपेक्षा आहे. एकूण कृषी क्षेत्राच्या वाढीवर लक्ष केंद्रित केलेले उपाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यास मदत करू शकतात.
आगामी काही दिवसात पाच राज्यांतील विधानसभा निवडणुका होणार आहेत. याचपर्शभूमीवर विशेषत: उत्तर प्रदेश आणि पंजाबसह पाच राज्यांतील आगामी विधानसभा निवडणुकांमुळे 1 फेब्रुवारीला पुढील अर्थसंकल्पातून शेतकरी आणि व्यापक कृषी समुदायाला फायदा होण्याची शक्यता आहे. एका सरकारी अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, केंद्र सरकारचे उद्दिष्ट मूल्यवर्धन वाढविण्यासाठी आणि शेतीशी मागास जोडणी विकसित करण्यासाठी गुंतवणूकीसाठी सहाय्य देणे आहे.
Share your comments