माजी कृषिमंत्री शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. शरद पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून ही धमकी देण्यात आली आहे. यामुळे आता चर्चा सुरू झाल्या आहेत.
याबाबत माहिती अशी की, तुमचा दाभोलकर करु', अशी धमकी ट्वीटरवरुन शरद पवार यांना देण्यात आली आहे. यानंतर सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे. या सर्वांची पारदर्शक चौकशी झाली पाहिजे.
मी राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे न्याय मागते आहे. ज्या पद्धतीने गृह विभाग अपयशी होत आहे याकडे अमित शाह यांनी लक्ष घालावं, अशी माझी विनंती असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. यामुळे आता तपासात काय समोर येणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जगातील सर्वात महाग फळ माहितेय? 1 किलोच्या किमतीत चांगली आलिशान कार येईल, जाणून घ्या..
राज्यात दडपशाही आणि गुंडाराज सुरु आहे. धमकी देणारा भाजपचा कार्यकर्ता आहे. जी धमकी आली आहे त्याच्या खाली त्याच पद्धतीने कमेंट्स करण्यात आल्या आहे, असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.
ऊसदरासाठी स्वाभिमानीचे 1 जुलैपासून आंदोलन, राज्यव्यापी आंदोलनाला रायगडावरून सुरुवात
दरम्यान, भाजप नेते निलेश राणे यांनी शरद पवार यांच्यावर काल जोरदार टीका केली. तसेच आज त्यांना धमकी आल्याने आता राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक होण्याची शक्यता आहे.
मक्याच्या दरात आंतरराष्ट्रीय पातळीवरही घसरण, शेतकरी अडचणीत..
उसाप्रमाणे दुधालाही FRP प्रमाणे दर मिळणार? भाजपच्या मित्रपक्षाने केली मोठी मागणी...
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर मान्सून केरळात दाखल, भारतीय हवामान विभागाची माहिती
Share your comments