N D Mahanor Death : रानातल्या कविता आता मावळल्या; नामदेव धोंडो महानोर यांचं निधन
कवी महानोर यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी झाला. औरंगाबाद जवळच्या अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या पळसखेड गावी महानोर यांनी आपल्या कवितेचे रान फुलवले.
ज्येष्ठ साहित्यिक आणि शेतकरी कवी नामदेव धोंडो महानोर यांचं आज (दि.३) सकाळी प्राणज्योत मालवली. ते ८१ वर्षाचे होते. महानोर यांच्यावर पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात उपचार सुरु होते.
मागील काही दिवसांपासून त्यांना किडनीचा त्रास होता. नंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. काही दिवस त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते.
कवी महानोर यांचा जन्म १६ सप्टेंबर १९४२ रोजी झाला. औरंगाबाद जवळच्या अजिंठा लेण्यांच्या पायथ्याशी असलेल्या पळसखेड गावी महानोर यांनी आपल्या कवितेचे रान फुलवले होते.
दरम्यान, पावसाळी कविता, वही, प्रार्थना दयाघना, तिची कहाणी, पुन्हा कविता, पक्षांचे लक्ष थवे, जगाला प्रेम अर्पावे, अजिंठा, पुन्हा कविता अशा साहित्यसंपदेने महानोर यांनी मराठी साहित्य विश्वात मोलाचे योगदान दिले.
English Summary: Death of Namdev Dhondo MahanorePublished on: 03 August 2023, 11:44 IST
कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा
प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.
Share your comments