1. बातम्या

मुलींनाही मिळणार वडिलांच्या संपत्तीत समान वाटा - सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने मुलींच्या बाजूने मोठा निर्णय दिला आहे. आदेशानुसार आता मुलीचा वडिलांच्या मालमत्तेतही समान वाटा असेल. 2005 च्या हिंदू उत्तराधिकार (दुरुस्ती) कायद्याच्या आधी वडिलांचा मृत्यू झाला असला तरीही, मुलीला वाटा मिळवण्याचा हक्क असल्याचे न्यायालयाने सांगितले.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव


सर्वोच्च न्यायालयाने मुलींच्या बाजूने मोठा निर्णय दिला आहे. आदेशानुसार आता मुलीचा वडिलांच्या मालमत्तेतही समान वाटा असेल. 2005 च्या हिंदू उत्तराधिकार (दुरुस्ती) कायद्याच्या आधी वडिलांचा मृत्यू झाला असला तरीही, मुलीला वाटा मिळवण्याचा हक्क असल्याचे न्यायालयाने सांगितले. तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने याप्रकरणी अनेक याचिकांवर सुनावणी केली होती. सुधारित कायद्यात मुलींना उत्तराधिकारमध्ये समान हक्क देण्याचा अधिकार आहे की नाही हे या याचिकेत म्हटले होते.

न्यायमूर्ती अरुण मिश्रा यांनी निकालात म्हटले आहे की, "मुलींनाही पुत्रांसारखे समान अधिकार मिळायला हवेत. मुलगी आयुष्यभर प्रेमळ असते. तिचे वडील जिवंत असोत किंवा नाही, ती नेहमी सहभागीदार बनलेली राहिल.

हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 ला लागू करण्यात आला. या कायद्याद्वारेच महिलांच्या मालमत्तेचे हक्क, संयुक्त हिंदू कुटुंबातील वारसा हक्काला मान्यता मिळाली. तथापि, तेव्हाही मुलीला सहकारी (कोपर्सनर) असा दर्जा देण्यात आला नव्हता. 2005 मध्ये संसदेने हिंदू उत्तराधिकार कायदा 1956 च्या कलम 6 मध्ये सुधारणा केली. मुलींना एका मुलासोबत एक सहदायक (कोपार्सनर) च्या रुपात मान्यता दिली. या माध्यमातून घटनेनुसार महिलांना समान दर्जा देण्यात आला होता. 9 सप्टेंबर 2005 रोजी हिंदू वारसा (दुरुस्ती) कायदा अस्तित्त्वात आला. संसदेने मान्य केले की मुलींना कोपार्सनरी न बनवून त्यांच्याशी भेदभाव केला जात आहे.

कोपर्सनरवर वाद का झाला?

मिताक्षर प्रणालीत महिला कोपर्सनर होऊ शकत नाहीत. एवढेच नाही तर पत्नी पतीच्या मालमत्तेची देखरेख करण्या पात्र असते. मात्र ती पतीची कोपर्सनर होऊ शकत नाही. एक आई आपल्या मुलीच्या संबंधात कोपर्सनर नाही. म्हणून, संयुक्त कौटुंबिक मालमत्तेत महिलेला पूर्ण हक्क नव्हते.

English Summary: Daughters get equal share in father's wealth - Supreme Court Published on: 12 August 2020, 06:32 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters