यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांची गणित बिघडली आहेत. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पेरण्या रखडल्या आहेत. धरणे कोरडी पडली आहेत. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.
असे असताना आता केंद्रीय जल आयोगाचा रिपोर्ट आला असून त्यामुळे महाराष्ट्राची काळजी वाढली आहे. यामध्ये राज्यातील प्रमुख धरणांमधील पाण्याच्या पातळीत चांगली वाढ झाली नसल्याचे दिसून येत आहे.
या धरणामध्ये केवळ २१ टक्केच पाणीसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत पाणीसाठा ४ टक्क्यांनी कमी आहे. त्यामुळे अनेक जलविद्युत प्रकल्पातून वीज निर्मितीला अडथळा निर्माण झाला आहे. यामुळे येणाऱ्या काळात चांगला पाऊस नाही झाला तर अडचणी निर्माण होणार आहेत.
एका अंड्याची कमीत चक्क १०० रुपये, जाणून घ्या काय आहे खासियत..
राज्यभरातील या जलाशयांची एकूण क्षमता १,९१६.६० कोटी घन मीटर इतकी आहे. त्या तुलनेत ती सध्या ४०६ कोटी घन मीटर इतकी भरली आहेत.
असे असताना मात्र १० वर्षांच्या सरासरीचा विचार केल्यास हा साठा क्षमतेच्या १ टक्का अधिक आहे. मोठ्या धरणांचा विचार केला तर उजनी धरणात तर शून्य टक्के साठा आहे. कोयना धरणामध्य फक्त २८ टक्के पाणीसाठा आहे. तर जायकवाडी धरण ६७ टक्के पाणीसाठा आहे.
या राज्यात आता देशी गायींच्या संगोपनासाठी योगी सरकार देणार ४० हजार रुपये
सर्वाधिक २४ धरणे ही मध्य महाराष्ट्रात आहेत. चारही क्षेत्रांचा विचार केल्यास, ३० जूनपर्यंत धरणक्षेत्रात सरासरीच्या ५२.५ टक्के पाऊस कमी पडला होता. सध्या चांगल्या पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत.
आम्ही साहेबांच्या सोबत!! बैलाच्या अंगावर लिहीत सांगलीतल्या वाळवामधील शेतकऱ्याचं पवार प्रेम दाखवलं..
टोमॅटोने केला कहर! दिल्लीत टोमॅटो 160 रुपये किलो....
आज जागतिक फणस दिवस, जाणून घ्या फणसाचे आरोग्यासाठीच फायदे
Share your comments