सर्वसामान्यांना दिलासा ; सिलिंडरच्या किमतीत ६२ रुपयांची कपात

Wednesday, 01 April 2020 05:54 PM


देशात कोरोनाचा संसर्ग होत असल्याने पंतप्रधान नरेंद्री मोदी यांनी लॉकडाऊन ची घोषणा केली.  लॉकडाऊन मुळे अनेक उद्योगधंदे बंद पडले असून मजुरांची रोजंदारी बंद झाली आहे.  अशात सर्वसामान्यांना दिलासा देणारी बातमी हाती आली आहे.  विना अनुदानित एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतीत कपात करण्यात आली आहे.  सिलिंडरच्या किमतीत तेल कंपन्यांनी मोठी कपात केली आहे.  दिल्ली आणि मुंबईमध्ये विना अनुदानित १४.२ एलपीडी सिलिंडर म्हणजेच आजपासून ६१ आणि ६२ रुपयांनी स्वस्त झाला आहे.

कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरची किंमत ६५ रुपयांनी तर चेन्नईमध्ये ६४.५० रुपयांनी कमी झाली आहे. दिल्लीत विना अनुदानित १४.२ किलो एलपीजी सिलिंडरची किंमत ७७४ रुपये आहे. तर कोलकातामध्ये ७७४ , मुबईत ७१४.५० आणि चेन्नईमध्ये ७६१.५० रुपये आहे. आजपासून हे नवे दर लागू करण्यात आले आहेत.  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी मोठी घोषणा केली आहे.  पंतप्रधान उज्ज्वला योजनेंतर्गत तीन महिन्यांपर्यंत एलपीजी घरगुती गॅस सिलिंडर मोफत देण्याची घोषणा करण्यात आली होती. यामुळे आठ कोटी बीपीएल कुटुंबीयांना तीन महिन्यांपर्यंत मोफत सिलिंडर मिळणार आहे.  दरम्यान येत्या दोन तीन दिवसात या सिलिंडरचे पैसे सरकार लाभार्थ्यांच्या खात्यात टाकणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

gas cylinder price oil company domestic cylinder गॅस सिलिंडर दर कपात किंमत
English Summary: cylinder's price down by 62 rs

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय
CopyRight - 2020 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.