परतीच्या पावसामुळे अनेक ठिकाणी जोरदार पाऊस झाला. यामुळे अनेकांचे मोठे नुकसान झाले. असे असताना देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर 'सितरंग' चक्रीवादळ धडकणार आहे. यामुळे अलर्ट जारी केला आहे.
याचा फटका पश्चिम बंगाल, आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, मिझोराम, मणिपूर, नागालँड या सात राज्यांना बसणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. यामुळे काळजी घ्यावी लागणार आहे. या वादळामुळे आज आसामच्या काही भागांत पाऊस झाला आहे.
सध्या सितरंग वादळाचा केंद्रबिंदू पश्चिम बंगालच्या उपसागरात दक्षिणेला 520 किलोमीटर तर बांगलादेशपासून 670 किलोमीटर समुद्रात होता. यामुळे मच्छिमारांना देखील काळजी घेऊन समुद्रात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
शेतकऱ्यांच्या गाई दूध दरात 3 आणि म्हैस दरात 2 रुपयांची वाढ
पश्चिम बंगालच्या उत्तर आणि दक्षिण परगणा, पूर्व मिदनापूरला या चक्रीवादळाचा मोठा फटका बसणार आहे. असे असताना सर्व सातही राज्यांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. यामुळे आता हे वादळ नेमकं किती नुकसान करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशी बटाटे विदेशींना पसंत, निर्यात 4.6 पटीने वाढली! आता बटाट्यापासून शेतकऱ्यांना चांगले दिवस..
दरम्यान, उद्या वाऱ्याचा वेग ताशी 90-100 किलोमीटर एवढा असू शकतो. असे हवामान खात्याने स्पष्ट केले आहे. त्यामुळे किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणात नुकसान होऊ शकते. यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
महत्वाच्या बातम्या;
'साखर कारखाना हे मंदिर आणि शेतकरी हे देव'
'गोलू' चा पॅटर्नच वेगळाय! खाद्य आणि किंमत वाचून येईल चक्कर..
शेतकऱ्यांनो तुम्ही असे का नाही करत? हा पठ्ठया विकतोय 100 रुपये किलोने ऊस, आता शेतकऱ्यांनाच व्यापारी व्हावे लागेल..
Share your comments