स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी हे कृषी पंपांना दहा तास दिवसा वीज पुरवठा व्हावा, सदोष बिले दुरुस्त करून द्यावीत या व अशा अनेक मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत.
सध्या कृषी पंप विज जोडणी खंडित करण्याचा प्रश्न विधिमंडळात देखील चांगलाच गाजत आहे. परंतु यावर अजून कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नसुन अशातच स्वाभिमानीच्या सोबत आता जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनीही मोहोळमध्ये अमरण उपोषण सुरू केले आहे.कृषिपंपांना बाबत महावितरणने घेतलेली भूमिका ही चुकीची असून यामुळे शेतकऱ्यांचे खूप नुकसान होत आहे. सध्या रब्बी हंगामातील पिके जोमात असताना तसेच सध्या तापमानात वाढ झाल्याने पिकांना पाण्याची नितांत गरज आहे. अशातच महावितरणकडून कृषिपंपांचा वीजपुरवठा खंडित केला जात असल्याने पिकांना पाणी देणे खूप कठीण जात आहे. याचा परिणाम थेट पिकांच्या उत्पादनावर होणार असून उत्पादनात घट येण्याची दाट शक्यता आहे.
जनहित शेतकरी संघटनेच्या मागण्या
शेतीला दिवसा वीजपुरवठा करावा तसेच खंडित केलेला वीज पुरवठा सुरळीत करावा, शेतकऱ्यांकडून सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी तसेच विज बिल भरून पावती न देणार्या कर्मचाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी हे आमरण उपोषण करण्यात येत असल्याची माहिती जनहितचे प्रभाकर देशमुख यांनी दिली. जोपर्यंत वीज बिलाची सक्तीची वसुली थांबवत नाही तोपर्यंत अमरण उपोषण सुरूच राहणार असल्याचा इशारा जनहित शेतकरी संघटनेने दिला आहे.
ऊर्जा मंत्र्यांशी झालेल्या चर्चेत राजू शेट्टी यांची भूमिका
शेतीला दहा तास दिवसा विद्युतपुरवठा करावा या मागणीसाठी राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. दरम्यान ऊर्जामंत्री यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आता आंदोलनाची पुढची दिशा काय असेल या संदर्भात आज दुपारी कार्यकर्त्यांसोबत होणाऱ्या बैठकीत निर्णय घेतला जाणार आहे.
Share your comments