1. बातम्या

अमरावती व बुलढाणा जिल्ह्यात होणार सीताफळ हब

मुंबई: शास्त्रोक्त पद्धतीने सीताफळाची लागवड, संगोपन, प्रक्रिया तसेच विपणन व्यवस्थेचा विकास करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात खेड (ता. मोर्शी) आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सीताफळ हब विकसित करण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करावी, असे निर्देश कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी येथे दिले.

KJ Staff
KJ Staff


मुंबई:
शास्त्रोक्त पद्धतीने सीताफळाची लागवड, संगोपन, प्रक्रिया तसेच विपणन व्यवस्थेचा विकास करण्यासाठी अमरावती जिल्ह्यात खेड (ता. मोर्शी) आणि बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर येथे सीताफळ हब विकसित करण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी करावी, असे निर्देश कृषीमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी येथे दिले.सीताफळ लागवडीच्या सर्वांगीण विकासाच्या अनुषंगाने डॉ. बोंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती.

त्यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले, सीताफळ हे पिक विदर्भातील शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन आणू शकते. सीताफळाच्या रोपे व झाडांना वन्यप्राणी खात नसल्याने इतर पिकांच्या तुलनेत याची लागवड फायदेशीर ठरु शकते. अधिकाधिक उत्पन्न देणाऱ्या जातींची लागवड करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे.

विदर्भात सीताफळ हब निर्माण करुन शास्त्रोक्त पद्धतीने सीताफळ लागवड, फळांची साठवणूक, गर काढणे त्यावर प्रक्रिया, रोपवाटिका विकास, ठिबक सिंचन पद्धती, विपणन व्यवस्थेचा विकास करण्याचे नियोजन करण्यात येईल. त्यासाठी कृषी विभागाने तात्काळ प्रस्ताव सादर करावा. सीताफळ लागवड अनुदानाबाबतचे पॅकेज निश्चित करण्यासाठी कृषी विद्यापीठाची मदत घ्यावी, असेही निर्देश डॉ. बोंडे यांनी दिले. बैठकीस कृषी विभागाचे सहसचिव अशोक आत्राम, कृषी सहसंचालक (फलोत्पादन) शिरीष जमदाडे आदी उपस्थित होते.

English Summary: Custard Apple Hub to be set up in Amravati and Buldhana district Published on: 10 July 2019, 08:11 IST

Like this article?

Hey! I am KJ Staff. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters