pm kissan yojana
केंद्र सरकारची महत्त्वाकांक्षी योजना पंतप्रधान किसान सम्मान निधि योजना असून या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपयांची मदत तीन टप्प्यात विभागून करण्यात येते. एम किसान सन्मान योजना च्या मागच्या वर्षीच्या हप्त्याचा विचार केला तर तिसरा हप्ता हा 25 डिसेंबर रोजी देण्यात आला होता.
यावर्षी हा तिसरा आता 15 डिसेंबरपासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल अशा प्रकारच्या बातम्या विविध माध्यमातून आल्या होत्या. यानंतर 16 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकऱ्यांच्या एका कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती समोर आल्यावर 16 डिसेंबरला दहावा हप्ता यायला सुरुवात होईल अशी चर्चा सुरू झाली. पंतप्रधान शेतकऱ्यांच्या या कार्यक्रमाला सहभागी झाले परंतु हा कार्यक्रम नैसर्गिक शेती बद्दल होता.या कार्यक्रमामध्ये गुजरात मधील सुमारे पाच हजार शेतकरी उपस्थित होते.
त्यांच्यासमोर पीएम मोदींनी नैसर्गिक शेतीचे फायदे सांगितले. परंतु या कार्यक्रमात पी एम किसान योजनेच्या पुढीलहप्त्याचा उल्लेख नव्हता. याबाबत अधिकृत पुणे काही सांगितले गेले नाही.
उशीर होण्याचे ही आहेत कारणे
पुढील आपल्या मिळण्यास होणारा विलंब हा राज्यांनी RFT वर स्वाक्षरी केली आहे,परंतु निधी हस्तांतरण आदेश अद्याप तयार झालेला नाही.
हा निधी हस्तांतरण आदेश तयार झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात पैसे जमा केले जातात.पीएम किसान योजनेचे अधिकृत वेबसाईट वरील स्थितीमध्ये सध्या फक्त RFT दिसत आहे..तसेच सरकारने या वेळी काही बदल केले आहेत.पीएम किसान योजनेचा फायदा घेण्यासाठी आता केवायसी सत्तेचे करण्यात आली आहे.या शेतकऱ्यांनीआतापर्यंत ईकेवायसी केलेले नाही त्यांचा पुढील हप्ता अडकू शकतो. त्यामुळे ज्यांनीईकेवायसी केली नसेल त्यांनी ही प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
Share your comments