1. बातम्या

सोयाबीनचे दर आणि शेतकऱ्यांची भूमिका,काय आहे नेमकी परिस्थिती?

यावर्षी पडलेल्या पावसामुळे खरीपातील महत्वाचे पीक सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. जर या वर्षाच्या सोयाबीन बाजार भावाचा विचार केला तर अगदी सुरुवातीपासून सोयाबीनचे बाजार भाव हे स्थिर राहिलेले नाही.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
the soyabioen

the soyabioen

यावर्षी पडलेल्या पावसामुळे खरीपातील महत्वाचे पीक सोयाबीनचे प्रचंड नुकसान झाले. जर या वर्षाच्या सोयाबीन बाजार भावाचा विचार केला तर  अगदी सुरुवातीपासून सोयाबीनचे बाजार भाव हे स्थिर राहिलेले नाही.

सोयाबीन चा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून देखील  हिचढउतार सुरूच आहे.यावर्षी शेतकऱ्यांनी सोयाबीनच्या उत्पादनात झालेली घट आणि मागणी यांचा ताळमेळ साधतच सोयाबीनची विक्री केली होती. मात्र शेतकऱ्यांच्या या भूमिकेमुळे दर टिकून राहिले होते. उत्पादनात जरी घट झाली परंतु दर चांगला मिळाल्याने ही भर भरून निघाली. परंतु दर कधीच टिकून राहिले नसल्याने सातत्याने होत असलेल्या चढ-उतारामुळे शेतकऱ्यांना आपली भूमिका देखील बदलावी लागली होती.सध्या खरिपातील साठवणूक केलेल्या सोयाबीन अंतिम टप्प्यात आहे.आणि दुसरीकडे दरांमध्ये दिवसेंदिवस घट होत आहे.

परंतु दरांमधील घट आणि भविष्यात उन्हाळी सोयाबीनची होणारी आवक यामुळे दर आणखीनच घटतील त्यामुळे अधिकचे काळ साठवणूक न करता सोयाबीन विक्री करण्यावर शेतकऱ्यांचा भर आहे.

 यावर्षी सोयाबीनचे दर हे शेतकऱ्यांच्या भूमिकेवर अवलंबून होते. कारण या वर्षी पावसामुळे सोयाबिनच्या उत्पादनात घट झाली होती त्यामुळे सोयाबीनचे मागणी वाढणार हे शेतकऱ्यांना माहीत होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी बाजारातील दराची स्थिती पाहून टप्प्याटप्प्याने  विक्री केली. त्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून हे दर टिकून होते. आता हंगामाच्या अंतिम टप्प्यात हे दर घसरले आहेत. 

तसेच जागतिक बाजारपेठेचा विचार केला तर जागतिक बाजारपेठेत सोयाबीनला असलेल्या मागणीतहीघटझालेली आहे. दुसरीकडे सोयाबीनची साठवणूक केली तर उन्हाळी हंगामातील सोयाबीनची आवक सुरू झाली तर जे दर आहेत तेही घसरतील अशी भीती शेतकऱ्यांना आहे. त्यामुळे आहे त्या दरात सोयाबीनची विक्री यावर शेतकऱ्यांचा सध्या भरआहे.

English Summary: current status of soyabioen rate in market and role of farmer Published on: 02 February 2022, 11:24 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters