परतीचा पाऊस अनेक भागात जोरदार कोसळत आहे. पावसामुळे विद्युत तारा तुटण्याच्या घटना घडत आहेत. तुटलेल्या विद्युत तारेच्या करंट तळ्यात उतरल्यानं अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यातील संगमनेर (Sangamner) तालुक्यात एक भीषण दुर्घटना घडली आहे. विद्युत तारेला चिकटून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
संगमनेर तालुक्यातील येठेवाडी गावात ही घटना घडली आहे. दर्शन अजित बर्डे (वय 6), विराज अजित बर्डे (वय 5) अनिकेत अरुण बर्डे (वय 6) ओंकार अरुण बर्डे (वय 7) अशी मृत्यू झालेल्या चिमुकल्यांची नावे आहेत.
हेही वाचा: ऐकावे ते नवलंच! चक्क विहीर चोरीला गेली! काय आहे अजब गजब प्रकार जाणून घ्या..
विद्युत तारेला चिटकून चार चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या या घटनेनं संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. अंघोळीसाठी गेलेल्या तळ्यात तुटलेल्या विद्युत तारेच्या झटक्याने ही चारही मुलं दगावली.
हेही वाचा: मोठी बातमी! धनुष्यबाण चिन्ह गोठवल्यास शिवसेना 'या' चिन्हाची मागणी करणार
एकाच कुटुंबातील चौघांचा या घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घराजवळ असलेल्या तळ्यावर चौघे अंघोळीसाठी गेले होते. वादळी वाऱ्याने तुटलेल्या केबलमध्ये प्रवाह सुरूच असल्यानं ही दुर्दैवी घटना घडली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
हेही वाचा: EPFO: दिवाळीपूर्वी खात्यात येणार पीएफचे व्याज, जाणून घ्या बॅलन्स कसा तपासायचा..
Share your comments