1. बातम्या

आंतरपिक म्हणून मसाला रोपांची लागवड आर्थिकदृष्ट्या निश्चित फायदेशीर

सिंधुदुर्ग: चांदा ते बांदा योजनेखाली शेती उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नारळ-सुपारी बागांमधून आंतरपिक म्हणून मसाला रोपांची लागवड शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या निश्चित फायदेशीर ठरेल, असा विश्वास पालकमंत्री दिपक केसरकर यांनी वेंगुर्ला फळ संशोधन केंद्रात आयोजित मसाला पिक रोपे वितरण समारंभात व्यक्त केला.

KJ Staff
KJ Staff


सिंधुदुर्ग:
चांदा ते बांदा योजनेखाली शेती उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नारळ-सुपारी बागांमधून आंतरपिक म्हणून मसाला रोपांची लागवड शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या निश्चित फायदेशीर ठरेल, असा विश्वास पालकमंत्री दिपक केसरकर यांनी वेंगुर्ला फळ संशोधन केंद्रात आयोजित मसाला पिक रोपे वितरण समारंभात व्यक्त केला.

वेंगुर्ले येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्रात आयोजित चांदा ते बांदा योजनेअंतर्गत मसाला पिके कलमे रोपे निर्मिती आदि वितरण कार्यक्रमात पालकमंत्री दिपक केसरकर प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर वेंगुर्ला पंचायत समितीचे सभापती श्री. मोरजकर, उपनगराध्यक्ष सौ. अस्मिता राऊळ, निवासी उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, सहयोगी संचालक डॉ. बलवंत सावंत, प्र.अधीक्षक कृषी अधिकारी एस. एन. म्हेत्रे, तहसिलदार प्रविण लोकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. प्रसाद देवधर यावेळी बोलताना म्हणाले, चांदा ते बांदा योजनेची माहिती आज सर्वदूर पोहचली असल्यानेच आजच्या या चर्चासत्राला उपस्थिती लक्षणिय आहे. मत्स्य, कृषी, पशूपालन याबाबतीत मनातील संभ्रम दूर करून या चांदा ते बांदा योजनेतील विविध योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. यावेळी पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या हस्ते शेतकऱ्यांना मसाला कलमांचे वितरण करण्यात आले.

 

 

English Summary: Cultivation of spice crops as a intercrop economically beneficial Published on: 30 July 2019, 06:47 IST

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters