गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात या वर्षीच्या खरीप हंगामात 32 हेक्टर क्षेत्रातवर धान , 5 हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस पिकाची लागवड केली जाणार आहे. त्या दृष्टीने तालुका कृषी विभागाने नियोजन केले आहे.
तालुक्यात मोठ्या प्रमाणात धान पिकाचे क्षेत्र असून गेल्या काही वर्षाव कापूस पिकाचे क्षेत्रातही वाढ होताना दिसत आहे. तालुक्यात दिना जलाशयासह लहान मोठ्या तलावाच्या साहाय्याने सिंचन सुविधा निर्माण करण्यात आली. येथील शेतजमीन धान पिकासाठी उत्तम असल्याने खरीप हंगामात धान पिकाचे उत्पादन हमखास होत असते.
कृषी विभाग नियोजनुसार, तालुक्यातील चामोर्शी, कुनघाडा, येणापूर, आष्टी, घोट परिसरात यावर्षी धान 32 हजार हेक्टर, कापूस पाच हजार हेक्टर, तूर बांधावर दोन हजार हेक्टर, तर सलग क्षेत्रमध्ये 50 हेक्टर, इतर कडधान्य व गळीत धान्य 300 हेक्टर, भाजीपाला 100 हेक्टर क्षेत्रात लागवड केली जाणार असून सोयाबीन 100 हेक्टरमध्ये संपूर्ण सोयाबीन पेरणी बीबीएफ पद्धती द्वारे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पेरीव धान लागवड धान शेतीवर हवामान बदलाचा फार मोठा परिणाम दिसून येतो.
चिखलणी योग्य पाऊस उपलब्ध न झाल्यामुळे धान रोपाच पर्हे अवस्था मध्येच वय वाढते व 30 दिवसांपेक्षा जास्त वयाची धानाची रोपे लागवड केल्यामुळे उत्पादन कमी होते. अशावेळी पेरीव धान एक उत्तम पर्याय आहे. पेरीव धानामुळे चिखलणी व रोवणी करणे, रोपे खोदणे, पेंड्या पसरविणे, नर्सरी पोसणे, आदी कामावरील खर्च कमी करता येतो.
शेतकऱ्यांना खरीप हंगामातील पिके पेरणीकरिता जमीन लवकर उपलब्ध होते. कमी पर्जन्यमान असताना वेळेवर पेरणी करता येईल व त्यामुळे कीड रोगाचा प्रादुर्भाव कमी होईल. कमी मजूर कमी खर्चात लागवड करता येईल, तर शेतामध्ये शेणखत व हिरवळीच्या खताचा वापर करावा असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
धान पिकामध्ये युरिया, डीएपी ब्रिकेटचा वापर करावा. तसेच रासायनिक खते य़ोग्य वळी योग्य प्रमाणात द्यावे, कीड रोगाच्या नियंत्रणाकरिता बांधीत उतरुन पिकाची पाहणी करावी कीड रोगाचा प्रादुर्भाव आढळून येताच कृषी विभागाचा सल्ला घ्यावा,असे आवाहन करण्यात आल आहे.
Share your comments