रताळे या पीकाची वर्षभर लागवड केली जाते. विशेषतः हिवाळ्यात त्याचे प्रमाण जास्त असते. बाजारात रताळ्याला नेहमीच मोठी मागणी असते. बटाट्यासारखे दिसणारे रताळ्याचे उत्पादन विविध राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. रताळे पेरणीसाठी सप्टेंबर आणि ऑक्टोबरचा पहिला पंधरवडा उत्तम मानला जातो. श्रीभद्रा वाण, गौरी वाण, श्री कनका वाण, सिप्सवा 2 वाण आणि ST-14 रताळ्याच्या या काही सुधारित जातीं आहेत.रताळ्याच्या या पाच प्रसिद्ध जातींच्या लागवडीमुळे चांगले उत्पादन मिळते आणि शेतकरी त्याची लागवड करून चांगला नफा देखील मिळवू शकतात.
श्रीभद्रा - ही रताळ्याची उच्च उत्पन्न देणारी जात असुन ही जात 90 ते 105 दिवसांत तयार होते. याची पाने रुंद असतात. हे कंद आकाराने लहान आणि गुलाबी असतात. या कंदामध्ये ३३ टक्के कोरडे पदार्थ, २० टक्के स्टार्च आणि २.९ टक्के साखरेचे प्रमाण असते.
गौरी- रताळ्याच्या या जातीचा शोध 1998 साली लागला आहे.या वाणाची पुर्ण वाढ होण्यासाठी 110 ते 120 दिवस लागतात. या जातीच्या कंदांचा रंग जांभळा आणि लाल असतो. गौरी जातीच्या रताळ्याचे सरासरी उत्पादन सुमारे 20 टन निघते.
श्री कनक - रताळ्याची श्री कनका जात 2004 मध्ये विकसित करण्यात आली होती. या जातीच्या कंदाची साल दुधाळ रंगाची असते. आत पिवळ्या रंगाचा लगदा दिसतो. ही जात 100 ते 110 दिवसांत परीपक्व होते. या जातीचे उत्पादन हेक्टरी 20 ते 25 टन घेता येवु शकते.
Sipswa 2- रताळ्याच्या या जातीचे उत्पादन आम्लयुक्त जमिनीत होते. त्यामध्ये कॅरोटीन मुबलक प्रमाणात असते. रताळ्याची ही जात ११० दिवसांत पिकते. त्याचे उत्पादन हेक्टरी 20 ते 24 टन आहे.
ST-14- २०११ मध्ये रताळ्याच्या या वाणाचा शोध लागला. रताळ्याच्या या जातीचा किंचित पिवळा कंदांचा रंग असतो. लगद्याचा रंग पिवळा असतो. क्वचीत हिरवाही असु शकतो. या जातीमध्ये व्हिटा कॅरोटीन जास्त प्रमाणात असते.
Share your comments